Iraq : श्रीलंकेनंतर इराकमध्ये गृहयुद्ध; गोळीबारात 20 जणांचा मृत्यू

श्रीलंकेनंतर आता इराकमध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे.
Sri Lanka like chaos in Iraq mob entered Rashtrapati Bhavan
Sri Lanka like chaos in Iraq mob entered Rashtrapati Bhavanesakal

श्रीलंकेनंतर आता इराकमध्ये अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 10 महिन्यांपासून देशात कोणतेही सरकार नाही आणि शक्तिशाली शिया धर्मगुरू मुक्तदा अल-सद्र यांनीही राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. त्याच्यात आणि इराणी समर्थक इराकींमध्ये संघर्ष सुरू झाला. या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Sri Lanka like chaos in Iraq mob entered Rashtrapati Bhavan)

श्रीलंकेतील प्रचंड आर्थिक संकटानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय संकट आले होते. संतप्त जमाव राष्ट्रपती भवनात घुसला होता. संसदेला ओलीस ठेवले. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडण्यास भाग पाडले होते.

इराकच्या सैन्याने वाढता तणाव कमी करण्यासाठी आणि चकमकीची शक्यता कमी करण्यासाठी सोमवारी शहरव्यापी कर्फ्यू जाहीर केला. सैन्याने धार्मिक नेत्याच्या अनुयायांना कडक सुरक्षा असलेल्या सरकारी क्षेत्रातून ताबडतोब माघार घेण्याचे आणि हिंसक प्रदर्शन थांबवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे इराकमध्ये आणखी हिंसाचार उसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इराक आधीच राजकीय संकटाचा सामना करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com