'भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे', श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka New PM Ranil Vikram Singhe Thanked PM modi

'भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे', श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार

कोलंबो : श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Sri Lanka New PM Ranil Vikram Singhe) यांनी आपल्या कार्यकाळात भारताशी घनिष्ठ संबंध हवे असल्याचे म्हटले आहे. यासोबतच स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात (Sri Lanka Economic Crisis) भारताकडून मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दलही त्यांनी पंतप्रधान मोदींचे (PM Modi) आभार मानले.

हेही वाचा: रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान; शपथ घेतली

७३ वर्षीय रानिल विक्रमसिंघे यांची गुरुवारी श्रीलंकेचे २६ वे पंतप्रधान म्हणून निवड झाली. कर्जबाजारी अर्थव्यवस्था आणि राजकीय पेचप्रसंग स्थिर करण्यासाठी नव्या पंतप्रधानाची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर भारताकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं. मला भारतासोबत घनिष्ठ संबंध हवे आहेत, असं ते म्हणाले. विक्रमसिंघे यांच्या शपथविधीनंतर एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भारताकडून आतापर्यंत ३ अब्ज डॉलरची मदत

भारताने जानेवारीपासून आतापर्यंत कर्जबाजारी श्रीलंकेला USD 3 अब्ज कर्ज दिले आहे. लोकशाही प्रक्रियेचे पालन करून श्रीलंकेच्या नवीन सरकारसोबत काम करण्यास इच्छुक असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले आणि भारत श्रीलंकेच्या लोकांसाठी वचनबद्ध आहे आणि राहील, असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

विक्रमसिंघेंवर मोदी होते नाराज -

रानिल विक्रमसिंघे हे पाचव्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांनी 2018 मध्ये भारताला भेट दिली होती. द हिंदूच्या वृत्तानुसार, 2017 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यावेळी संयुक्त प्रकल्पांच्या संथ गतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. श्रीलंकेच्या तत्कालीन सरकारकडून मिळालेल्या प्रतिसादावर आपण समाधानी नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. आता 73 वर्षीय युनायटेड नॅशनल पार्टी (UNP) नेत्याने सोमवारपासून श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

सरकार समर्थक आंदोलकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. या हल्ल्याने राजपक्षे कुटुंबातील विश्वासू लोकांविरुद्ध असंतोष निर्माण झाला असून हिंसाचारात आतापर्यंत ९ लोकांचा मृत्यू झाला, २०० हून अधिकजण जखमी झाले आहेत.

Web Title: Sri Lanka New Prime Minister Ranil Vikram Singhe Thanks Pm Modi For Help In Crisis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiSri Lanka
go to top