भारतासाठी श्रीलंकेनं पाकिस्तानचे PM इम्रान खान यांना दिला दणका

टीम ई सकाळ
Monday, 22 February 2021

सध्या लंकेचं सरकार चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. तर भारत कोरोना व्हॅक्सिन निर्यात करून अनेक देशांना मदत करत आहे. भारताने नुकतंच श्रीलंकेला कोविशिल्ड व्हॅक्सिनचे पाच लाख डोस दिले आहेत. 

कोलंबो - भारतासोबत वाद होऊ नये यासाठी श्रीलंकेने त्यांच्या संसदेत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे होणारे भाषण रद्द केले आहे. Colombo Gazette मध्ये  'Sri Lanka avoids clash with India by cancelling Khan's Parliament speech' अशा टायटलने छापण्यात आलेल्या अहवालात डार जावेद यांनी म्हटलं आहे की, श्रीलंकेचं सरकार भारतासोबतचे संबंध बिघडवू इच्छित नाही. सध्या लंकेचं सरकार चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली आहे. तर भारत कोरोना व्हॅक्सिन निर्यात करून अनेक देशांना मदत करत आहे. भारताने नुकतंच श्रीलंकेला कोविशिल्ड व्हॅक्सिनचे पाच लाख डोस दिले आहेत. 

गेल्या काही महिन्यांपासून लंकेत मुस्लिम विरोधी वातावरण तयार केलं जात आहे. कारण याठिकाणी बौद्ध समाजातील लोक मशिदीत होणाऱ्या पशुहत्येचा विरोध करत आहेत. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, इम्रान खान यांनी भाषणात मुस्लिम कार्डवर भर दिला आहे. गेल्या वर्षी अफगाणिस्तानमध्येही त्यांनी असंच केलं होतं. 

जावेद यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी 2021 मध्ये तालिबानचं समर्थन केलं होतं. दहशतवादी कारवाया जिहाद आहेत. याला इस्लामिक कायद्यात योग्य म्हटलं असल्याचं म्हणत त्यांनी समर्थन केलं होतं. त्यांनी मुस्लिमांचे मुद्दे उपस्थित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठचा वापर केला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एका कट्टरपंथीयाने शिक्षकाचा खून केल्यानंतर काळजी व्यक्त केली होती. त्यावर पाकच्या पंतप्रधानांनी मुस्लिम देशांना विरोध करण्यास सांगितलं होतं. तसंच पत्रही लिहून म्हटलं होतं की, बिगर मुस्लिम देशांमध्ये इस्लामोफोबिया वाढत आहे त्याचा विरोध करा असंही त्यांनी सांगितलं होतं. 

हे वाचा - चीनची राजकीय खेळी, स्वतःच्या नागरिकांपेक्षा जगाला कोरोना लस पुरवण्यासाठी खटपट

आधीच्या काही घटना पाहिल्या तर असं सांगता येतं की, त्यांना संसदेत बोलण्याची संधी देणं मृत्यूशी खेळण्यासारखं आहे. ते या प्लॅटफॉर्मचा वापर अशा गोष्टींसाठी करतील ज्यामुळे लंकेच्या बौद्ध समाज आणि सरकारला अडचणीत आणतील. ज्या पद्धतीने इमरान खान यांनी लंकेच्या मुस्लिम नेत्यांची विनंती स्वीकारली होती त्यावरून नक्की होतं की, ते अल्पसंख्यांकांच्या शोषणाचा मुद्दा भाषणावेळी उपस्थित करतील असंही जावेद यांनी म्हटलं. 

इम्रान खान यांनी लंकेच्या या मुद्यावर याआधी वक्तव्य केलं होतं.  All-Ceylon Makkal Congress चे नेते रिशद बथिउद्दिन यांनी पाकिस्तानी सरकारकडे लंकेने लागू केलेल्या कोविड 19 च्या गाइडलाइनमध्ये दखल देण्याची विनंती केली होती. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अग्निसंस्कार करण्याचा नियम होता. इम्रान खान यांनी मृतदेह दफन करण्याबाबत उघडपणे वक्तव्य केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: srilanka cancels pakistans pm imran khan speech