
नवी दिल्ली : श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनाश्यवक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती चिघळली असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अशा परिस्थिती भारताने शेजारधर्म निभावत आतापर्यंत ३.५ अब्ज डॉलरची मदत केली आहे.
आम्ही आमच्या शेजारधर्माच्या धोरणानुसार, श्रीलंकेच्या लोकांना सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी मोठी मदत केली आहे. भारतानं आतापर्यंत ३.५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक किंमतीची मदत श्रीलंकेला केली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
श्रीलंकेतील परिस्थिती काय? -
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेत आर्थिक संकट उद्भवलं आहे. परकीय चलनांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. तरीही नागरिक दोन ते तीन दिवस रांगेत उभं राहून इंधनाची खरेदी करत आहेत. यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले असून सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. सोमवारी श्रीलंकेत पंतप्रधान राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील आंदोलनाने हिंसाचाराचे रुप घेतले. आंदोलक एकामागून एक राजकारणी आणि खासदारांची घरे जाळत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
आंदोलकांनी निट्टंबुवा शहराबाहेर खासदार अमरकिर्थी अथुकोर्ला यांची गाडी रोखली. यावेळी त्यांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यावेळी दोन जण गोळ्या लागून जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू देखील झाला. त्यानंतर आंदोलकांनी खासदारांना घेरले. आपली सुटका होत नसल्याचे पाहून खासदारांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, श्रीलंकेतील भारतीयांना सुखरूप मायेदीश परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून त्यांच्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.