esakal | इस्रायलमध्ये भीषण चेंगराचेंगरीत 44 जणांचा मृत्यू; बोनफायर फेस्टिव्हलमध्ये दुर्घटना

बोलून बातमी शोधा

इस्रायलमध्ये भीषण चेंगराचेंगरीत 44 जणांचा मृत्यू

कोरोनाच्या संकटातून थोडा दिलासा मिळालेल्या इस्रायलनं बोनफायर फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.

इस्रायलमध्ये भीषण चेंगराचेंगरीत 44 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जेरुसलेम - जगभरात कोरोनाने थैमान घातलं असताना ज्या इस्रायलने मास्कमुक्तीची घोषणा केली तिथं मोठी दुर्घटना घडली आहे. कोरोनाच्या संकटातून थोडा दिलासा मिळालेल्या इस्रायलनं बोनफायर फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं. यावेळी झालेल्या गर्दीमध्ये भीषण चेंगराचेंगरी झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये सध्या 12 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी आपत्ती असल्याचं म्हटलं असून नागरिक सुरक्षित रहावेत यासाठी प्रार्थना केली. माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, माउंट मेरन इथं स्टेडिअमच्या खुर्च्यांची मोडतोड झाली. स्थानिक माध्यमांनी इस्रायलमधील मृत्यूचा आकडा हा 38 असल्याचं म्हटलं आहे. मॅगन डेव्हिड अॅडम रेस्क्यू सर्व्हिसने 38 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त दिलं आहे. याशिवाय काही लोकांचा रुग्णालयातही मृत्यू झाला आहे. झीव्ह रुग्णालयाने त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: कोरोना होऊन गेलेल्या तरुणांनी लस घ्यावी का?

दुर्घटना घडेलंल ठिकाण हे यहुदींसाठी जगातल्या पवित्र अशा स्थळांमधील एक असं आहे. हजारो यहुदी याठिकाणी येतात. रात्रभर प्रार्थना आणि डान्सच्या कार्यक्रमाचं आयोजन इथं केलं जातं. दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर इथले व्हिडिओ व्हायरल होत असून ती दृश्ये भयानक अशी आहेत. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी दाखल करण्याचं काम पोलिस आणि वैद्यकीय कर्मचारी करत आहेत.