esakal | कोरोना होऊन गेलेल्या तरुणांनी लस घ्यावी का? 'लॅन्सेट’चे महत्त्वाचे संशोधन

बोलून बातमी शोधा

young girl

एकदा कोरोना झालेल्या युवकांना या विषाणुच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही. त्यांना कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते.

कोरोना होऊन गेलेल्या तरुणांनी लस घ्यावी का?
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- एकदा कोरोना झालेल्या युवकांना या विषाणुच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नाही. त्यांना कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते. त्यामुळे, त्यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ‘द लॅन्सेट रेसपिरेटरी मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. अमेरिकेतील युएस मरिन कॉर्प्समधील १८ ते २० वयोगटातील तीन हजार युवकांवर संशोधन केले.

अमेरिकेतील माऊंट सिनाई येथील इकाहन स्कूल ऑफ मेडिसिनमधील संशोधकांनी युवकांनी शक्य होईल तसा लस घेण्यावर भर दिला. यापूर्वी कोरोनाचा संसर्ग होऊन गेला असला आणि प्रतिपिंडे अस्तित्वात असली तरी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यकच आहे. तरुणांना कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो. शिवाय, पूर्वीप्रमाणे त्यांच्याकडून इतरांमध्येही तो पसरू शकतो. संशोधक प्रा. स्टुअर्ट सीलफॉन म्हणाले, की कोरोनावरील लशी उपलब्ध होत असतानाच पूर्वी कोरोना होऊन गेला असला तरीही युवकांना तो पुन्हा होऊ शकतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पूर्वीच्या संसर्गामुळे प्रतिकारशक्तीची हमी मिळत नाही. त्यामुळेच अतिरिक्त संरक्षणासाठी लसीकरणाला पर्याय नाही.

हेही वाचा: आता ड्राय स्वॅबवरून होणार कोरोना टेस्ट; कमी वेळेत मिळणार रिपोर्ट

कसे केले संशोधन?

संशोधकांनी मागील वर्षी मे ते नोव्हेंबरदरम्यान कोरोना होऊन गेलेल्या युवकांवर संशोधन केले. यावेळी १८९ जणांपैकी (सिरोपॉझिटिव्ह) दहा टक्के म्हणजे १९ जणांना कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यांची इतर २,३४६ जणांपैकी पूर्वी संसर्ग न झालेल्या १,०७९ जणांशी (सिरोनिगेटिव्ह) तुलना केली. या युवकांची प्रतिपिंडांची चाचणीही करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणाऱ्या बहुतेक युवकांमध्ये त्याची लक्षणे आढळली नाहीत. नौदलात भरती झालेल्या युवकांवर हे संशोधन करण्यात आले असले तरी सर्वच युवकांना कोरोनाच्या फेरसंसर्गाचा धोका असल्याचा संशोधकांचा दावा आहे.