Tennessee Gun Bill: अमेरिकेचं चाललंय काय? आता शिक्षक-कर्मचाऱ्यांनाही शाळेत नेता येणार बंदूक; गोळीबाराच्या घटना वाढल्यामुळे आणला नवा कायदा

Tennessee Schools: हे विधेयक आता रिपब्लिकन गव्हर्नर बिल ली यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. जर त्यांना ला व्हेटो न दिल्यास, विधेयकाचे त्यांच्या स्वाक्षरीने किंवा त्याशिवाय कायद्यात रुपांतर होईल.
Tennessee Schools
Tennessee Schools Esakal

अमेरिकेतील टेनेसी राज्याच्या विधीमंडळाने नुकतेच एक विधेयक मंजूर केले आहे. ज्यामुळे राज्यातील शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना शाळेत हँडगन घेऊन जाण्याची परवानगी मिळणार आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण असलेल्या टेनेसी विधी मंडळात हे विधेयक ६८-२८ मतांनी मंजूर झाले. त्यानंतर आंदोलकांनी गॅलरीमधून त्याचा विरोध केला. या महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या सिनेटने या कायद्याला मंजुरी दिली होती.

गेल्या वर्षी नॅशव्हिल शाळेतील हत्याकांडात तीन मुले आणि तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यापासून, टेनेसीमध्ये बंदुकीवरील निर्बंधांवर जोरदार चर्चा सुरू होती. सभागृहातील काही डेमोक्रॅट्सनी कॅपिटलच्या आत निदर्शने करण्यास मदत केली, ज्यामुळे गेल्या वर्षी त्यांची विधी मंडळातून हकालपट्टी झाली होती.

आता या विधेयकामुळे सशस्त्र शिक्षकांसंबंधी वाद पुन्हा पेटला आहे, कारण केवळ अमेरिकन शाळांमध्येच नव्हे तर परेड, उत्सव आणि इतरत्रही सामूहिक गोळीबार होतात.

गन वायलेन्स आर्काइव्हच्या मते, गोळीबार ही यूएसमधील मुलांच्या हत्येमागील प्रमुख कारण आहे. या वर्षी गोळीबारात 436 मृत्यू झाले आहेत.

सध्या, यूएस मधील राज्यांपैकी काही राज्यातील शिक्षक आणि इतर शालेय कर्मचाऱ्यांना शाळेच्या मैदानावर बंदुका बाळगण्याची परवानगी आहे.

या विधेयकानुसार, पालकांना त्यांच्या मुलाचे शिक्षक सशस्त्र असल्याची माहिती देणे बंधनकारक नाही.

ज्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्याला शाळेत बंदूक बाळगायचे असेल त्यांनी प्रथम शाळेच्या पोलिसिंगमध्ये किमान 40 तासांचे प्रशिक्षण बंधनकारक आहे. शिवाय, त्यांनी विस्तारित कॅरी परमिट मिळवणे आवश्यक आहे. तसेच मनोवैज्ञानिक परीक्षा उत्तीर्ण करणेही आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com