Coronavirus: मधुमेहावरील 'स्टँटिन्स'मध्ये ऍंटी-कोरोना व्हायरस गुणधर्म; संशोधनात समोर आले निष्कर्ष

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 28 September 2020

जगभरात कोरोनाची साथ दिवसेंदिवस पसरत आहे. कोरोनावरील लशींवर सध्या जगभरात संशोधन सुरु आहे. यादरम्यानच आता चांगली बातमी आली आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाची साथ दिवसेंदिवस पसरत आहे. कोरोनावरील लशींवर सध्या जगभरात संशोधन सुरु आहे. यादरम्यानच आता चांगली बातमी आली आहे. कोरोनाच्या रुग्णांची त्रास कमी करण्यासाठी स्टँटिन्स महत्वाचं ठरत आहे, असं निरीक्षण एका संशोधनात दिसून आलं आहे. या औषधाचा उपयोग शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्यासाठी केला जातो. अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजी (AJC) आणि द ईएमबीओ जर्नलमध्ये छापून आलेल्या रिसर्चनुसार, स्टँटिन्समुळं कोरोना रुग्णांना झालेली लागण 50 टक्क्यांनी कमी केली जाऊ शकते. विषेश म्हणजे स्टँटिन्स हे औषध स्वस्त असून ते 5 ते 50 रुपयांत मिळून जातं. 

रुग्ण लवकर बरे होण्यास मदत आहे-
AJC या नियतकालिकात 15 सप्टेंबरला आलेल्या एका संशोधनानुसार, यात 170 रुग्णांचं निरिक्षण केलं गेलं. या सर्व कोरोना रुग्णांना सॅन दिएगो मेडीकल सेंटरमध्ये भरती केलं गेलं होतं. रिसर्चनुसार, स्टँटिन्सच्या वापराने कोरोनाची लागण शरीरात पसरण्यापासून थांबवण्यात 50 टक्क्यांपर्यंत मदत मिळाली होती. संशोधकांच्या मते स्टँटिन्सच्या सेवनाने कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यात मदत होत होती. ईएमबीओच्या संशोधकांनी असं दिसून आले की, कोलेस्टेरॉल आणि लिपिड मेटाबॉलिसममध्ये सामाविष्ट असणाऱ्या CH25H जिनमध्ये ऍंटी-कोरोना व्हायरस गुणधर्म दिसून आले. यामुळे कोरोना व्हायरसच्या पेशींना पसरण्यापासून रोकलं.

 Coronavirus : भारतात कोरोना रुग्णांमध्ये वाढ पण, WHOकडून मोदींचे कौतुक

स्टँटिन्स  =कसं मदत करते?
स्टँटिन्सचं काम धमन्यांमधील कोलेस्टेरॉल कमी करण्याचं आहे. फोर्टिस सी-डॉक हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अनूप मिश्रांनी सांगितलं की, आपल्या शरीरातील पेशींच्या मेम्ब्रेनमध्ये कोलेस्टेरॉल असतं. दुसऱ्या अभ्यासात स्टॅटिन्स मेम्ब्रेनमधून कोलेस्टेरॉल काढण्यास मदत करू शकते, ज्यामुळे पेशींच्या मेम्ब्रेनमध्ये व्हायरसच्या पसरणे थांबते. हे औषध हृदयविकार आणि मधुमेहाचे रुग्ण घेतात. महत्वाचे म्हणजे ही औषधे घेणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना लवकर नीट होत असल्यांचं दिसून आलं आहे.

 गिलगीट-बाल्टीस्तानमध्ये निवडणुका घेऊन पाकिस्तानचा प्रत्युत्तराचा डाव

लस येईपर्यंत असंच काम करावं लागणार-
आतापर्यंत जगभरात कोरोनावरील पुर्णपणे बरी होणारी लस तयार केली नाही. जगभरात 150 हून अधिक लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. अशाप्रकारे सध्या अस्तित्वात असलेल्या औषधांचा वापर हाच सर्वोत्तम पर्याय मानला जात आहे. मॅक्स साकेत येथील वैद्यकीय विभागाचे सहसंचालक डॉ. रोमेल टिकू यांनी सांगितले की, स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या औषधामुळे कोविड रुग्णांचा मृत्यू टाळता आला तर ते अतिशय उपयुक्त ठरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statins useful to corona patients which drugs can lower cholesterol in body