अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका सावत्र बापाला त्याच्या १७ महिन्यांच्या मुलाच्या रडण्याने इतका कंटाळा आला की त्याने बाळाला जमिनीवर फेकून मारले. २७ वर्षीय आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरुद्ध खून आणि बाल शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी झाचेरी विल्यम्सने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला.