किम जोंग उन : अशी आहे त्यांच्या रहस्यमय जीवनाची कहाणी

This is the story of Kim Jong Un mysterious life
This is the story of Kim Jong Un mysterious life
Updated on

प्यांगयांग : किम जोंग ऊन यांना यंग जनरल किंवा ब्रिलियंट काँम्रेड असेही संबोधले जाते. वर्कर्स पार्टी आँफ कोरियाच्या चौथ्या बैठकीत 27 मार्च 2012 रोजी किम यांची निवड केली गेली, 11 एप्रिल रोजी त्यांची देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड केली गेली. किम जोंग-नाम या आपल्या सावत्र भावाला त्यांनी नेहमी शत्रूच मानले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर कोरियातील प्यांगयांग शहरात 8 जानेवारी 1984 रोजी किम यांचा जन्म झाला. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग-इल आणि को यांग हुई यांच्या पोटी किम जोंग-उन यांचा जन्म झाला. स्विर्त्झलंडमधील कोंझ येथील लायफेल्ड स्टेन्झील पब्लिक स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. किम उल-सुंग विद्यापिठ आणि किम उल-सुंग मिलिटरी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले. अर्थशास्त्रात त्यांनी डाँक्टरेट मिळवली होती.

वादाच्या भोवऱ्यातील किम...
2011 च्या अखेरीला सत्तेवर आलेल्या किमने सत्तरवर अधिकाऱ्यांचे शिरकाण केल्याचा आरोप, जुलै 2015 मध्ये दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री यन बंग-से यांनी केला होता. उत्तर कोरियांने आपल्या आण्विक प्रक्षेपकांवर हायड्रोजन बाँबही जोडल्याचा दावा उत्तर कोरियातील सरकारी माध्यमांनी डिसेंबर 2015 मध्ये केला होता. आमच्यावर जर अमेरिकेने हल्ला केला, तर आम्ही त्याला हायड्रोजन बाँबचा हल्ला करून प्रत्युत्तर देवू, असा सज्जड दम किम यांनी 2015 मध्ये अमेरिकेला दिला होता.

6 जुलै 2016 रोजी अमेरिकेतील तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनाने किम यांच्यासह त्यांच्याबरोबरील दहा अधिकाऱयांवर निर्बंध लादले होते. किम जोंग-ऊन यांच्या नेतृत्वाखालीच, जानेवारी 2016 मध्ये हायड्रोजन बाँबची भूमीगत चाचणी घेतली होती.

किम यांची अशीही काही वैशिष्ट्ये...

  • कोणत्याही लष्करी अनुभवाशिवाय किम उत्तर कोरियाच्या लष्कराचे प्रमुख बनले होते.
     
  • आजोबा आणि उत्तर कोरियाचे एकेकाळचे सर्वेसर्वा किम इल-संग यांच्यासारखे दिसता यावे म्हणून किम जोंग-उन यांनी आपल्यावर काँस्मेटिक सर्जरी करून घेतली होती.
     
  • किम 29 वयाचे असताना, 2012 मध्ये ओनियन दैनिकाने किम यांना, सेक्सियस्ट मॅन अलाईव्ह असे संबोधले होते.
     
  • किम यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा साऱ्या उत्तर कोरियाने आपल्या वडिलांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला, असे ते म्हणतात.
     
  • किम यांची राजवट उलथवण्यासाठी त्यांचे काकांनी प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून, तो सिद्ध झाल्याचे सांगत त्यांना ठार करण्यात आले होते. त्यावेळी या काकांना विवस्त्र करण्यात आले, त्यानंतर त्यांना हिंस्त्र कुत्र्यांच्या पिंजऱयात सोडण्यात आले, त्यानंतर त्यांना ठार करण्यात आले. त्यांच्यानंतर, त्यांची पत्नी शोक करत असताना तिलाही ठार करण्यात आले होते.
     
  • किम यांचा हेअरकट उत्तर कोरियात अतिशय लोकप्रिय होता. विद्यापिठातील अनेक विद्यार्थी त्यांच्यासारखा हेअरकट करा, असे सांगतात. त्यावरून त्यांना नागरिक अॅम्बीशियस असेही म्हणायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com