Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

पनामाच्या ‘एमटी ऑन पीस’ जहाजावर हल्ला; ओमानच्या मदतीने खलाशांना सुरक्षित बाहेर काढले, भारताची तीव्र चिंता
Missile attack on merchant vessel in Strait of Hormuz; 11 Indian sailors injured

Missile attack on merchant vessel in Strait of Hormuz; 11 Indian sailors injured

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली : जागतिक व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ११ भारतीय खलाशांसह एकूण १२ जण जखमी झाले आहेत. ओमानच्या सागरी किनाऱ्याजवळ मंगळवारी पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी ऑन पीस’ (MT On Peace) या व्यापारी जहाजावर हा हल्ला करण्यात आला. जखमी खलाशांना ओमानच्या प्रशासनाच्या मदतीने तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, त्यांच्यावर ओमानमधील खासब (Khasab) येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या जहाजावरील एकूण १९ कर्मचाऱ्यांपैकी १७ जण भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com