esakal | ‘एनआरएफ’ची व्यूहात्मक माघार
sakal

बोलून बातमी शोधा

kabul

काबूल: ‘एनआरएफ’ची व्यूहात्मक माघार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल : पंजशीर प्रांतात तालिबानच्या विरोधात उभे ठाकलेल्या नॅशनल रेझिस्टन्स फोर्सने (एनआरएफ) व्यूहात्मक माघार घेतल्याचा दावा केला आहे. ६० टक्के भाग अजूनही आपल्या नियंत्रणात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लवकरच प्रतिआक्रमण करू असा इशाराही त्याने दिला.

हेही वाचा: अफगाणिस्तानात पत्रकारांवरही बंधन? आंदोलनाचं रिपोर्टिंग पडलं महागात

‘एनआरएफ’चा नेता अली नझारी याने एका परदेशी संकेतस्थळाला माहिती दिली. त्यानुसार पंजशीर खोऱ्याची भौगोलिक रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. तेथे हल्ला करणाऱ्या कोणत्याही एका आक्रमकास पूर्ण भाग ताब्यात घेणे अशक्य असते, कारण अनेक लहान खोऱ्यांचा यात समावेश आहे, ज्यातील ६० ते ६५ टक्के लहान खोऱ्यांवर आणि व्यूहात्मक ठिकाणांवर आमचे अजूनही नियंत्रण आहे, असेही त्याने ठामपणे सांगितले. हा प्रांत गमावल्याचा दावा त्याने खोडून काढला. तालिबानचे मोठे नुकसान झाल्याचे त्याने नमूद केले.

तो पुढे म्हणाला की, पंजशीरमधील सध्याची परिस्थिती बातम्यांच्या तुलनेत जास्त गुंतागुंतीची आहे. तालिबानने पंजशीरमधील केवळ मुख्य मार्ग ताब्यात घेतला आहे. प्रांताचे केंद्र त्यापासून जवळ आहे. त्यामुळेच तालिबान्यांना कार्यालयावर त्यांचा झेंडा फडकावता आला.

मसूद, सालेह देशातच

पंजशीरचा नेता अहमद शाह मसूद आणि माजी उपाध्यक्ष अम्रुल्लाह सालेह हे अजूनही अफगाणिस्तानमध्येच असल्याचे सत्तेवरून हटविण्यात आलेल्या सरकारचे अधिकारी झहीर अघबार यांनी सांगितले. या दोघांनी ताजिकिस्तानला पलायन केल्याचे वृत्त होते.

loading image
go to top