भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणखी वाढणार

Helicopter
Helicopter
Updated on

अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून सी हॉक हेलिकॉप्टर घेणार
नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकी बनावटीचे एमएच-६० आर सी-हॉक हेलिकॉप्टर दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदीच्या ९०५ लाख डॉलरच्या करारलभ मंजूरी देण्यात आली आहे. करारानुसार अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टिन भारताला २१ हेलिकॉप्टर देणार आहे. 

अमेरिकी सरकारने काल कराराची अधिकृत सूचना जारी केली असून याप्रमाणे या हेलिकॉप्टरचा पहिला ताफा सप्टेंबर २०२४ पर्यंत भारताला मिळण्याची शक्यता आहे. यात तीन एमएच-६० आर सी हॉक हेलिकॉप्टर भारतीय नौदलास तर एक २१ एमएच-६० आर भारत सरकारला देण्यात येणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात या कराराची पायाभरणी झाली होती. याप्रमाणे अमेरिकी प्रशासनाने भारताच्या लष्करी कराराला मंजुरी दिली. एमएच-६० रोमिओ सी हॉक हेलिकॉप्टरमध्ये पाणबुडी भेदी क्षेपणास्त्रे सोडण्याची क्षमता आहे. हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर  वेगवान हालचालीसाठी प्रसिद्ध आहे. त्यावरून ॲंटी सबमरीन मार्क ५४ टोरपॅडो सोडता येऊ शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com