पाकिस्तानला भूकंपाचा मोठा धक्का

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या नैऋत्य किनाऱयावर असलेल्या पासनी शहराला आज (बुधवार) पहाटे 6.3 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला, अशी माहिती अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिली.

अधिकाऱयांनी सांगितले की, पासनी शहराला पहाटे 3 वाजून 4 मिनिटानी 6.3 रिश्टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपामध्ये पडझड अथवा जिवीत हानीचे वृत्त नाही. परंतु, भूकंपानंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. अनेकजण घर सोडून रस्त्यांवर पळत आले होते.

दरम्यान, कराची शहराला काही आठवड्यांपूर्वीच 3.6 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला होता.

Web Title: Strong 6.3 quake strikes off coast of Pakistan