Corona Virus Spread : वटवाघूळ नव्हे तर 'या' प्राण्यामुळे कोरोना पसरला, पण चीनने सगळे पुरावेच नष्ट केले

कोरोनाचा उगम वुहानच्या प्राण्यांच्या बाजाराशी संबंध जोडणारा आहे.
Corona Raccoon Dog
Corona Raccoon DogSakal

कोरोना महामारीचा फटका जगाला बसल्यापासून त्याच्या उगमाबद्दल गोंधळ सुरू आहे. वटवाघूळामुळे हा आजार पसरत आहे, असंही सांगण्यात आलं. तर हा विषाणू मानवनिर्मित असल्याचंही काही जणांनी दावा केला.

मात्र आता रकून डॉग या प्राण्यामुळे हा विषाणू पसरला, असावा असंही बोललं जात आहे. चीनमधील वुहान येथील प्राण्यांच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या रकून डॉग्जमुळे जगभरात कोरोना पसरला.

काही नवीन अनुवांशिक पुराव्यांमध्ये याचे संकेत सापडले आहेत. मात्र ज्या अनुवांशिक डेटाच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आलं होतं ते शेअर केल्यानंतर काही दिवसांनी चीनने काढून टाकलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ३ वर्षांपूर्वी हा डेटा जाहीर न केल्याबद्दल चीनला फटकारलं आहे आणि आता हा डेटा काढून टाकला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा उगम वुहानच्या प्राण्यांच्या बाजाराशी संबंध जोडणारा आहे.

Corona Raccoon Dog
H3N2 Deaths : ताप अंगावर काढू नका; राज्यात २ मृत्यू झाल्यावर आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

अमेरिकेत पुन्हा एकदा अशी चर्चा होत आहे की कोरोना विषाणू वुहानच्या व्हायरोलॉजी लॅबमध्ये बनवला गेला आणि अपघाताने लीक झाला. ही चर्चा होत असतानाच कोरोनाच्या उगमाबद्दल हे नवे पुरावे आढळले आहेत.

नवीन अनुवांशिक डेटा वुहानमधील हुनान सीफूड होलसेल मार्केटमधून जानेवारी २०२० मध्ये घेतलेल्या स्वॅब नमुन्यांमधून आला आहे. हा बाजार चीन सरकारने सुरुवातीला संशयाच्या आधारे बंद केला होता.

Corona Raccoon Dog
H3N2 Virus : सावधान! पुण्यात वाढतोय H3N2 आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणे...

हे स्‍वॅबचे नमुने घेतले तेव्हा बाजारात एकही प्राणी उपस्थित नव्हता, परंतु शास्त्रज्ञांनी बाजारातील भिंती, स्टॉल आणि पिंजऱ्यांमधून स्‍वॅबचे नमुने घेतले. यापैकी एक नमुना रकून डॉगचा आहे, ज्यामध्ये कोरोना विषाणूचे अनुवांशिक भाग देखील आढळले आहेत.

तज्ञांचं म्हणणं आहे की केवळ या डेटाच्या आधारे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही की कोरोना विषाणू रकून डॉग्जपासून मानवांमध्ये पसरला आहे.

या रकून डॉगला विषाणूची लागण झाली असण्याची शक्यता आहे, परंतु हा विषाणू मानवाला त्यांच्यापासून नाही तर त्यांच्यापासून संसर्ग झालेल्या इतर प्राण्यांपासून मिळाला आहे. या रकून डॉग्जला इतर कोणत्यातरी प्राण्यामुळे किंवा तिथे काम करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या माणसांकडून संसर्ग झाल्याचीही शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com