esakal | लॉकडाऊन काळात पुरुषांपेक्षा महिला होत्या कमी आनंदी; एका अभ्यासाचा निष्कर्ष

बोलून बातमी शोधा

sad woman}

लॉकडाऊनचा मानवी आयुष्यावर अत्यंत दुरगामी असा परिणाम झाला, हे निश्चित. सगळं जग घरामध्ये बंदिस्त झाल्यामुळे अनेक लहानसहान मात्र महत्त्वपूर्ण बदल घडलेले दिसून आले. 

लॉकडाऊन काळात पुरुषांपेक्षा महिला होत्या कमी आनंदी; एका अभ्यासाचा निष्कर्ष
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेलं नाहीये. परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरीही कोरोनाचं संकट अजूनही डोकं वर काढताना दिसत आहे. हा रोग जेंव्हा जागतिक महासाथ म्हणून घोषित करण्यात आला तेंव्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी 2020 या वर्षात जगभरात ठिकठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात सगळं जगच ठप्प झालं  होतं. याचा मानवी आयुष्यावर अत्यंत दुरगामी असा परिणाम झाला, हे निश्चित. सगळं जग घरामध्ये बंदिस्त झाल्यामुळे अनेक लहानसहान मात्र महत्त्वपूर्ण बदल घडलेले दिसून आले. 

हेही वाचा - दोन पाकिस्तानी सुना परतल्या भारतात; वाघा बॉर्डरवरुन झाली सासरी पाठवणी
या काळातील झालेल्या बदलांबाबत सध्या अनेक अभ्यास समोर येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात घरी राहिल्यानंतर जेंडर अर्थात लिंगभावातील असमानतेचे परिणाम कशाप्रकारे झाले, याचाही अभ्यास करण्यात आला. एका अभ्यासाच्या निष्कर्षानुसार, लॉकडाऊनच्या काळात महिला नेहमीपेक्षा कमी आनंदात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या काळात महिला, खासकरुन ज्यांना मुलं आहेत अशा महिला, मुलांची देखभाल आणि घरगुती कामांमध्येच व्यस्त राहिल्या होत्या. याचा परिणाम म्हणून महिलांच्या आनंदामध्ये घट झाल्याचा निष्कर्ष एका अभ्यासाने काढला आहे.  लॉरा एम. गिरोजा, ऍशली व्ही. व्हिलान्सब, आणि आयसे येमिस्किगिल यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. PNAS या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासासाठी युनायटेड स्टेट्स, कॅनडा, डेन्मार्क, ब्राझील आणि स्पेनमधून नमुने घेण्यात आले होते. 

हेही वाचा - शेतकरी आंदोलनावर ब्रिटनच्या संसदेत चर्चा; भारताने व्यक्त केली नाराजी

लॉकडाऊनच्या काळात अनेक महिलांनी आपल्या मुलांची देखभाल आणि घरातील सगळ्या प्रकारची कामे यातच आपला वेळ घालवला आहे. पुरुषांपेक्षा या कामांमध्ये गुंतण्याचं प्रमाण महिलांचं अधिक होतं, त्यामुळे त्यांच्या आनंदी राहण्यात घट झाल्याचं हा रिपोर्ट सांगतो. जेंडर अर्थात लिंगभावामधील असमानतेमुळे लॉकडाऊनच्या काळात कशाप्रकारे परिणाम झाला, याचा अभ्यास याद्वारे करण्यात आला. कोरोनामुळे मानवी आयुष्य विस्कळीत झालं होतं. मात्र, यातूनही उपाय काढत अनेक संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी दिली होती.