यूएईच्या ‘अल-अमल’ उपग्रहाचे जपानमधून यशस्वी प्रक्षेपण

पीटीआय
Tuesday, 21 July 2020

जपानमधील तानेगाशिमा अवकाश केंद्रावरून एच-२ए या रॉकेटच्या साह्याने ‘अल-अमल’चे प्रक्षेपण करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळाने उपग्रह रॉकेटपासून विलग झाला आणि त्याने तसा सिग्नलही नियंत्रण कक्षाकडे पाठविला. रॉकेटपासून विलग झाल्यावर एक तासाने उपग्रहाला जोडलेले सौर पॅनेल उघडले गेले. दुबईतील अल खवानीज येथे मोहिमेचा नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे.

दुबई - संयुक्त अरब अमिरातीच्या ‘अल-अमल’ (आशा) या उपग्रहाचे आज जपानमधील प्रक्षेपण केंद्रावरून मंगळाच्या दिशेने यशस्वी उड्डाण करण्यात आले. दुसऱ्या ग्रहावरील अरब जगातील ही पहिलीच  मोहिम आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जपानमधील तानेगाशिमा अवकाश केंद्रावरून एच-२ए या रॉकेटच्या साह्याने ‘अल-अमल’चे प्रक्षेपण करण्यात आले. उड्डाणानंतर काही वेळाने उपग्रह रॉकेटपासून विलग झाला आणि त्याने तसा सिग्नलही नियंत्रण कक्षाकडे पाठविला. रॉकेटपासून विलग झाल्यावर एक तासाने उपग्रहाला जोडलेले सौर पॅनेल उघडले गेले. दुबईतील अल खवानीज येथे मोहिमेचा नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. हा उपग्रह पुढील सात महिन्यांत ४९ कोटी ३५ लाख किलोमीटर अंतर कापून मंगळाच्या कक्षेत पोहोचणार आहे. या मोहिमेत कोरोना संसर्गाचा सर्वांत मोठा अडथळा आला. 

कृष्णविवराचे प्रभामंडळ टिपण्यात शास्त्रज्ञांना यश; आजवरची अद्भूत घटना!

वर्षभर फिरणार
आतापर्यंतच्या बहुतेक मंगळ मोहिमांमध्ये उपग्रह हा दिवसाच्या ठराविक वेळीच कक्षेत फिरतो. त्यामुळे दिवसात एकदाच वातावरणाची नोंद घेतली जाते. ‘अल-अमल’ उपग्रह मात्र मंगळावरील पूर्ण एक वर्षभर, म्हणजे पृथ्वीवरील जवळपास दोन वर्षे, मंगळाभोवती फिरणार आहे.

मोहिमेची वैशिष्ट्ये
२० कोटी डॉलर एकूण खर्च
६ वर्षे उपग्रह तयार करण्यासाठी लागलेला कालावधी
६८७ दिवस उपग्रह मंगळाच्या कक्षेत फिरणार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful launch of UAEs Al Amal satellite from Japan

Tags
टॉपिकस
Topic Tags: