अफगाण तुरूंगावर आत्मघातकी हल्ला

यूएनआय
Tuesday, 4 August 2020

अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट (आएएस) दहशतवाद्यांनी तुरुंगावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात २१ जण ठार व ४३ जण जखमी झाले. पूर्व नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमधील तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले.

२१ ठार; ४२ जखमी, इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी
काबूल - अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट (आएएस) दहशतवाद्यांनी तुरुंगावर केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात २१ जण ठार व ४३ जण जखमी झाले. पूर्व नांगरहार प्रांताची राजधानी जलालाबादमधील तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर सुरक्षा दलावर बेछूट गोळीबार केला. दलाच्या प्रत्युत्तरात तीन हल्लेखोर मारले गेले. या तुरूंगात दीड हजार कैदी आहेत. त्यात आयएसशी संबंधित संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. रविवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. सोमवारीही तुरुंगातून गोळीबाराचे जोरदार आवाज येत होते, असे नानगारहार प्रांताचे सरकारी प्रवक्ते अट्टाउल्लाह खोगयानी यांनी सांगितले. मृतांमध्ये कैद्यांबरोबरच नागरिक, तुरूंगरक्षक आणि सुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयएसने स्वीकारली. या संघटनेची मुख्यालय नांगरहार प्रांतात आहे.  

इस्त्राईलने स्वत:भोवती तयार केलंय अदृष्य कवच; शत्रू राष्ट्राला हल्ला करणं सोपं नाही

या हल्ल्यामागील उद्देश तत्काळ समजू शकला नाही. मात्र, हल्ल्यादरम्यान काही कैद्यांनी तुरुंगातून स्वत:ची सुटका केल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. या तुरूंगात दीड हजार कैदी आहेत. त्यात आयएसशी संबंधित संघटनेच्या शेकडो दहशतवाद्यांचा समावेश आहे.

जलालाबादजवळ विशेष सुरक्षा दलाने इस्लामिक स्टेटच्या वरिष्ठ कमांडरला ठार केले होते. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला.

कोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती

इस्लामिक स्टेटचा तालिबानशीही पंगा
इस्लामिक स्टेट इराक आणि सिरियामध्ये इस्लामी राज्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी संघटना अफगाणिस्तानमध्ये सातत्याने संघर्ष करत असून तालिबानविरुद्धही ती लढत आहे. या पार्श्वभूमीवर या हल्ल्याशी आमचा संबंध नव्हता, असे तालिबानचा राजकीय प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले. फेब्रुवारीत अमेरिका व तालिबानमध्ये शांतता करार झाला होता.

अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली असून यापैकी बहुतेक हल्ले इस्लामिक स्टेटशी संलग्न स्थानिक गटांनी केले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide attack on Afghan prison