भारताच्या भूमिकेमुळे आश्चर्य : इम्रान खान

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन करताना काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सुटणार नाही असे म्हटले होते. ट्रम्प यांनी मोदींच्या विनंतीवरून आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न सोडविण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर भारताने जोरदार आक्षेप नोंदविला होता.

वॉशिंग्टन : काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान मध्यस्थाची भूमिका निभावण्याची दर्शविलेल्या तयारीवर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन करताना काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेने सुटणार नाही असे म्हटले होते. ट्रम्प यांनी मोदींच्या विनंतीवरून आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न सोडविण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर भारताने जोरदार आक्षेप नोंदविला होता. भारताने ट्रम्प यांच्याकडे अशी कोणतीही मागणी केली नसल्याचे म्हटले होते. 

याविषयी बोलताना इम्रान खान म्हणाले, की गेल्या 70 वर्षांपासून कोणताही तोडगा निघू न शकलेल्या काश्मीर मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला असताना त्यावर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. काश्मीरमधील जनतेच्या अनेक पिढ्यांनी खूप काही सोसले असून अद्यापही रोज हालअपेष्टा सोसत आहेत. लवकरच या मुद्द्यावर तोडगा काढला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surprised by reaction of India to Donald Trumps offer says Imran Khan