Sydney Bondi Beach Shooting
esakal
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील प्रसिद्ध बांडी बीच परिसरात दोन अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दोघांनी मिळून जवळपास ५० राऊंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबार केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, काही वेळानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केलं आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.