Coronavirus: सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरामध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक, संशोधनात सिद्ध

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 30 November 2020

लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे

लंडन: कोरोनाच्या महामारीच्या दरम्यान एक नवीन चकित करणारी बाब समोर आली आहे. एका दाव्यानुसार कोरोनाचा बाधा झालेले आणि लक्षणे दिसत असलेले रुग्ण लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक धोकादायक असू शकतात. सिम्प्टोमिक रुग्ण असिम्प्टोमिक रुग्णांपेक्षा चार पटीने जास्त कोरोनाचा प्रसार करू शकतात.

त्याचबरोबर सिम्प्टोमिक रुग्णासोबत राहणाऱ्या लोकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संसर्गाची प्रारंभिक लक्षणे पाहताच त्या व्यक्तीने किंवा रुग्णाने स्वतःला वेगळे केले पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

लसीमुळे आजारी पडल्याचा दावा करणाऱ्या स्वयंसेवकावर सीरमचा 100 कोटींचा दावा

संशोधकांना असे आढळून आलं आहे की, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पाच दिवसांच्या लक्षणांमध्ये कुटुंबातील एका सदस्याकडून दुस-या कुटुंबातील सदस्याकडून संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. अशी व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

इंपिरियल कॉलेजचे प्राध्यापक नील फर्ग्युसन (neil ferguson) या संशोधनाबद्दल बोलताना म्हणाले की, लक्षणे नसलेले रुग्ण लक्षणे असलेल्या रुग्णांपेक्षा कमी संसर्गजन्य असतात. हे संशोधन मेटा डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. त्यात जुलैच्या मध्यापर्यंत प्रकाशित झालेल्या 45 कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अभ्यासाचा समावेश होता. 

कोरोनावरील लशीची परिणामकारकता पडताळण्यासाठी ॲस्ट्राझेनेका कंपनी जागतिक पातळीवर अतिरिक्त चाचण्या करण्याची शक्यता आहे. यामुळे नियामकांकडून मंजुरी मिळण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता मुख्य कार्यवाह पास्कल सोरीओत यांनी फेटाळून लावली.

Corona Updates: चाचण्यांच्या संख्येत तब्बल 4 लाखांनी घट; रुग्णवाढही कमी

ॲस्ट्राझेनेकाकडून दोन पद्धतीच्या चाचण्या झाल्या. पहिला डोस अर्धा व दुसरा पूर्ण आणि दोन पूर्ण डोस अशा पद्धती होत्या. यातील कमी डोसच्या म्हणजे एक अर्धा आणि एक पूर्ण अशा पद्धतीत ९० टक्के परिणामकारकता आढळून आली. दुसऱ्या पद्धतीत मात्र केवळ ६२ टक्के परिणामकारकता आढळली. यावरून अंतिम टप्प्यातील चाचण्यांच्या अभ्यासातील निष्कर्षांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशावेळी कमी डोसच्या पद्धतीमधील परिणामकारकता पडताळण्यासाठी अतिरिक्त चाचण्या होतील.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: symptomatic corona patients are more dangerous than asymptomatic