बगदादीच्या अंडरविअरमधून मिळवले 'डीएनए' नमुने; वाचा कशी झाली कारवाई?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

सीआयए आणि सीरियन कुर्दीश 15 मेपासून बगदादीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तो नेहमी त्याच्या वास्तव्याची स्थळे बदल होता.

दमास्कस : इराक आणि सीरियामध्ये रक्तरंजित कारवायांचा धुमाकूळ घालणाऱ्या "इसिस' या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अबू बक्र अल- बगदादी याला अमेरिकेने ठार मारण्यापूर्वी एका सीरियन कुर्द गुप्तचराने बगदादीच्या दोन अंडरविअरवरून त्याचे डीएनए घेतल्याची आश्‍चर्यजनक माहिती उघड झाली आहे. सध्या सीरियन ड्रेमोक्रॅटिक फोर्सेसाठी ज्येष्ठ सल्लागार म्हणून काम करणाऱ्या पोलॅट कॅन यांनी गुप्तचरांच्या कामगिरीचा एक अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये या बाबीचा उल्लेख करण्यात आला आहे.

भारतातील दुधात आढळले कॅन्सर होणारे घटक

पटविण्यासाठी अंडरविअर आणली
'सीआयए आणि आम्ही 15 मेपासून बगदादीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. तो नेहमी त्याच्या वास्तव्याची स्थळे बदल होता. आमच्या टीममधील काही मंडळी बगदादीच्या घरापर्यंत पोचण्यात यशस्वी झाली होती. त्यांनी त्याची ओळख पटविण्यासाठी त्याची अंडरविअर आणली होती, यावरून 'डीएनए' संकलित करण्यात आले होते. या माध्यमातून तो बगदादीच असल्याचे निश्‍चित करण्यात आले,' असे पोलॅट यांनी नमूद केले. 

दिवाळी साजरी करणाऱ्या जहीर खानला धमकी 
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर भारताचा स्टार खेळाडू

कारवाईचे नियोजन 
अमेरिकेने वायव्य प्रांतातील इदलिब या ठिकाणी कारवाई करत बगदादीचा खात्मा केला होता. या भागामध्ये सीरियन डेमोक्रॅटिक सुरक्षा दलांचे चांगले नेटवर्क आहे. या कारवाईसाठी समन्वयक त्या भागांत पाठविण्याबरोबरच प्रत्यक्ष घटनास्थळावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सैनिक उतरविण्यापर्यंतचे नियोजन सीरियाच्या सुरक्षा दलांनी आखले होते, असे पोलॅट यांनी नमूद केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादीला ठार मारल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करतानाच या कारवाईसाठी मदत करणाऱ्या सीरियन कुर्दीश सुरक्षा दलांचेही त्यांनी आभार मानले होते. पण, ट्रम्प यांनी या सुरक्षा दलांनी नेमकी कशी मदत केली हे मात्र जाहीर केले नव्हते. अमेरिकेच्या या मोहिमेला तुर्कस्तान, इराक आणि रशिया यांनीही साह्य केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Syria kurds get dna samples of baghdadi from his underwear