4 वर्षांच्या युद्धानंतर सीरियन लष्कराचा अॅलेपोवर ताबा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

अॅलेपो- नागरी युद्धाला सुरवात झाल्यापासून सीरियातील उद्ध्वस्त झालेले दुसरे शहर अॅलेपोमध्ये पूर्ण नियंत्रण मिळविण्यात सीरियन लष्कराला यश आले आहे. अॅलेपोवर गुरुवारी पूर्ण ताबा मिळविल्याचे सीरियन लष्कराने म्हटले आहे. 

येथे अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. पूर्व अॅलेपोमध्ये मागील महिनाभरापासून सरकारी फौजा आणि संयुक्त लष्कराने आक्रमकपणे येथे कारवाया सुरू केल्या होत्या. 
तत्पूर्वी, बंडखोरांनी शहरातील ताबा मिळविलेल्या भागांतून त्यांच्यापैकी सुमारे चार हजारांहून अधिक हल्लेखोरांनी अंतिम टप्प्यात शहर सोडले, अशी माहिती रेड क्रॉस संस्थेने दिली आहे. 
पूर्व अॅलेपोमधील पराभव हा सीरियातील बंडखोर चळवळीला गेल्या सहा वर्षे सुरू असलेल्या लढाईमधील सर्वांत मोठा धक्का आहे. या युद्धाच्या काळात सुमारे 3 लाख 10 हजार लोक मारले गेले. 

Web Title: syrian army takes over aleppo