अमेरिकेकडून सीरियातील सिनेमॅटोग्राफरला प्रवेशबंदी

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

'द व्हाईट हेल्मेट्स' या लघुकथेला (डॉक्युमेंटरी) ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन देण्यात आले आहे. या लघुकथेला पुरस्कार मिळण्याची शक्यता असून, या पुरस्कार सोहळ्यासाठी खालिद खातीब अमेरिकेत येण्यासाठी उत्सुक होता.

लॉस एन्जल्स - ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेत येण्यास उत्सुक असलेला सीरियातील चित्रपट छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) खालिद खातीब याला अमेरिकेने प्रवेश नाकारला आहे.

'द व्हाईट हेल्मेट्स' या लघुकथेला (डॉक्युमेंटरी) ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नामांकन देण्यात आले आहे. या लघुकथेला पुरस्कार मिळण्याची शक्यता असून, या पुरस्कार सोहळ्यासाठी खालिद खातीब अमेरिकेत येण्यासाठी उत्सुक होता. मात्र, अमेरिका प्रशासनाने त्याच्याबद्दल आक्षेपार्ह माहिती मिळाल्याने त्याला प्रवेश नाकारला आहे.

सीरियातील एका गावातील 60 हजार नागरिकांचा जीव वाचविणाऱ्या व्यक्तीवर ही लघुकथा करण्यात आली आहे. 40 मिनिटांच्या या लघुकथेत खालिदने सिनेमॅटोग्राफरचे काम केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. मात्र, ती नंतर न्यायालयाने उठविली होती.

Web Title: Syrian cinematographer denied entry into US to attend Oscars