इराणमध्ये मोठा अपघात; ट्रेन रुळावरून घसरल्याने 10 ठार, 50 हून अधिक जखमी

Iran Train Accident
Iran Train Accidentesakal
Updated on
Summary

या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणमध्ये आज (बुधवार) एक मोठी दुर्घटना घडलीय. आज सकाळी इराणमध्ये एक पॅसेंजर ट्रेन अपघाताची (Iran Train Accident) शिकार बनलीय. ट्रेन रुळावरून घसरल्याने किमान 10 जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा रेल्वे अपघात देशाच्या पूर्व भागात असलेल्या एका शहरात घडलाय. सरकारी माध्यमांनी ही माहिती दिलीय.

Iran Train Accident
देशात मोठ्या आत्मघाती हल्ल्याची शक्यता; 'अल कायदा'ची भारताला थेट धमकी

या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वृत्तानुसार, इराणमधील तबास या वाळवंटी शहराजवळ (Train Derailed in Tabas) पहाटेच्या अंधारात ट्रेनच्या सातपैकी चार बोगी रुळावरून घसरल्या. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com