बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांच्या चित्राची विटंबना; काळी शाई फासली, आक्षेपार्ह पोस्टरही लावले

Rabindranath Tagore Portrait Vandalised in Bangladesh : एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असलेले पोस्टरही लावण्यात आले. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे
Rabindranath Tagore,

Rabindranath Tagore,

esakal

Updated on: 

बांगलादेशात प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या चित्राची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खुलना रेल्वे स्थानकाच्या परिसरातील भिंतीवर काढलेल्या टागोरांच्या चित्रावर काळी शाई फासण्यात आली. एवढंच नाही तर त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असलेले पोस्टरही लावण्यात आले. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...