Earthquake: तैवानमध्ये एकाच रात्रीत भूकंपाचे तब्बल 80 धक्के...एका बाजूला कलंडल्या मोठमोठ्या इमारती

Earthquake: तैवानमध्ये एका रात्रीत 80 भूकंप झाले, 3 एप्रिलच्या भूकंपात नुकसान झालेल्या इमारती आता एका बाजूला झुकल्या आहेत.
Earthquake
EarthquakeEsakal

हुलिएन(Hualien)च्या अग्निशमन विभागाने सांगितले की 3 एप्रिल रोजी झालेल्या भूकंपानंतर एका हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि काल रात्री झालेल्या भूकंपानंतर ते आणखी झुकले आहे. मात्र, सध्या त्या इमारतीत हॉटेल चालवले जात नसल्याचेही विभागाने सांगितले.

वीस दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपातून तैवानचे लोक अद्याप पूर्णपणे सावरले नाहीत अशातच, पुन्हा एकदा तैवानची जमीन भूकंपाने हादरली आहे. एका रात्रीत येथे भूकंपाचे 80 धक्के जाणवले आहेत. यातील सर्वात शक्तिशाली भूकंप ६.३ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपानंतर 3 एप्रिलच्या भूकंपात नुकसान झालेल्या इमारती आता आणखी बाजूला झुकल्या आहेत.

Earthquake
Uber: येड्यांचा गोंधळ खुळ्यांची जत्रा! हिटलरशी संबंध जोडत उबेरकडून 'स्वस्तिका' नावाच्या तरुणीवर बंदी

या भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियनच्या ग्रामीण पूर्वेकडील काऊंटीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. येथेच 3 एप्रिल रोजी 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये सुमारे 14 लोकांचा मृत्यू झाला होता. या मोठ्या भूकंपानंतर, तैवानमध्ये शेकडो भूकंप झाले आहेत.

हॉटेल बंद

हुआलियन(Hualien)च्या अग्निशमन विभागाने सांगितले की 3 एप्रिल रोजी झालेल्या भूकंपानंतर एका हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि काल रात्री झालेल्या भूकंपानंतर ते आणखी झुकले आहे. मात्र, सध्या त्या इमारतीत हॉटेल सध्या चालवले जात नसल्याचेही विभागाने सांगितले.

भूकंप का आणि कसे होतात?

ते वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेण्यासाठी आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. त्याच्या खाली द्रवरूप लावा आहे आणि त्यावर टेक्टोनिक प्लेट्स तरंगत आहेत. अनेक वेळा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. वारंवार आदळल्यामुळे, काहीवेळा प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जेव्हा जास्त दाब येतो तेव्हा या प्लेट्स तुटू लागतात. अशा स्थितीत खालून येणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. जेव्हा यामुळे गोंधळ निर्माण होतो तेव्हा भूकंप होतो.

Earthquake
Sri Lanka Car Racing Accident: श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये भीषण दुर्घटना; लहान मुलासह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २३ जण जखमी

तीव्रता कशी मोजली जाते?

भूकंप रिश्टर स्केलवर मोजले जातात. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप 1 ते 9 पर्यंत त्याच्या केंद्रापासून म्हणजेच केंद्रबिंदूपासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचे मोजमाप करते.

Earthquake
Maldives Election: मालदीवमध्ये अध्यक्ष मुइझ्झू यांची लाट! निवडणुकीमध्ये चीनप्रेमी पक्षाचा दणदणीत विजय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com