Uber: येड्यांचा गोंधळ खुळ्यांची जत्रा! हिटलरशी संबंध जोडत उबेरकडून 'स्वस्तिका' नावाच्या तरुणीवर बंदी

Swastik: "स्वस्तिक" हे एक प्राचीन चिन्ह आहे जे अनेक भारतीय, युरेशियन, आफ्रिकन आणि अमेरिकन संस्कृतींमध्ये दिसून येते. तथापि, पाश्चिमात्य देशांमध्ये, हे सामान्यतः जर्मन नाझी पक्षाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
Uber Swastika Chandra
Uber Swastika ChandraEsakal

जागतिक स्तरावर लोकप्रीय असलेला राइड-हेलिंग आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म, उबेरने अलीकडेच स्वस्तिका चंद्र नावाच्या भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन तरुणीवर त्यांचा प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालून बिनकामाचा वाद ओढावून घेतला होता.

न्यूयॉर्क पोस्टच्या मते, ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाने चिन्ह आणि तरुणीच्या नावत साम्य असल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला.

उबेरन काही दिवसांपूर्वी 'स्वस्तिक' हा शब्द आक्षेपार्ह म्हणून घोषित केला होता. उल्लेखनीय म्हणजे, "स्वस्तिक" हे एक प्राचीन चिन्ह आहे जे अनेक भारतीय, युरेशियन, आफ्रिकन आणि अमेरिकन संस्कृतींमध्ये दिसून येते. तथापि, पाश्चिमात्य देशांमध्ये, हे सामान्यतः जर्मन नाझी पक्षाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये "संभाव्यपणे आक्षेपार्ह" शब्द असल्याने उबरने तिच्या खात्यावर अचानक बंदी घातल्यानंतर प्रकरण वाढले.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या तरुणीला ऑक्टोबर 2023 पासून Uber सेवा वापरण्यास बंदी घालण्यात आली होती.

स्वस्तिका चंद्राने एका कार्यक्रमात बोलताना आपला हा कटू अनुभव शेअर करताना सांगितले की, तिला उबेरच्या सेवा वापरण्यास मनाई करण्यात आली होती.

मला उबेरकडून मेसेज आला की, "तुमचे पहिले नाव उल्लंघन करत आहे आणि तुम्हाला ॲपवर तुमचे नाव बदलणे आवश्यक आहे. पण मी यावर निराशा व्यक्त करत नाव बदलण्यास नकार दिला."

स्वस्तिका चंद्रा पुढे म्हणाली की, "हिटलरने स्वस्तिक चिन्हाचा गैरवापर करण्यापूर्वी हजारो वर्षे आधी हिंदूंनी त्याचा वापर केला होता हे त्यांना माहीत नाही,"

Uber Swastika Chandra
Sri Lanka Car Racing Accident: श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये भीषण दुर्घटना; लहान मुलासह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २३ जण जखमी

स्वस्तिका चंद्रा म्हणाली की, तिच्या अद्वितीय नावामुळे तिचे जन्म प्रमाणपत्र, ऑस्ट्रेलियन नागरिकत्व प्रमाणपत्र, हेल्थ केअर कार्ड किंवा ड्रायव्हींग परवाना यासारख्या अधिकृत कागदपत्रांमध्ये कधीही समस्या उद्भवल्या नाहीत.

द हिंदू कौन्सिल आणि NSW ॲटर्नी जनरल यांच्या पाठिंब्याने, Uber प्लॅटफॉर्मने तिच्यावरील बंदी उठवली. NSW ज्युईश बोर्ड ऑफ डेप्युटीजने देखील चंद्राला पाठिंबा दिला.

Uber Swastika Chandra
Maldives Election: मालदीवमध्ये अध्यक्ष मुइझ्झू यांची लाट! निवडणुकीमध्ये चीनप्रेमी पक्षाचा दणदणीत विजय

दरम्यान आपली चूक लक्षात आल्यानंतर या वादाला उत्तर म्हणून, उबरने स्वस्तिका चंद्राची माफी मागितली आणि तिच्यावरी बंदी उठवली.

कंपनीने म्हटले: "उबेर सर्व युजर्सना सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहे."

कंपनीने असेही म्हटले आहे की, आम्हाला समजले आहे की नावांबाबत विविध सांस्कृतिक बारकावे आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक खात्याचे योग्य मूल्यमापन व्हावे यासाठी आमचे कर्मचारी सर्व बाबींवर लक्ष ठेवतात.

कंपनीने म्हटले आहे की, 'या प्रकरणी चंद्रा यांच्याकडून आलेल्या विनंतीनंतर आम्ही त्यांच्यावरील बंदी उठवली आहे. त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांच्या संयमाची प्रशंसा करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com