हिजाब घालून आंघोळ ते बॉडी मसाजवर बंदी; तालिबानचे नियम

महिला यापुढे सार्वजनिक बाथरूममध्ये आंघोळ करू शकणार नाहीत
taliban
talibansakal

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) बल्ख प्रांतात तालिबानने महिलांच्या सार्वजनिक स्नानगृहांवर बंदी (Ban on women public bath) घातली आहे. उझबेकिस्तानला लागून असलेल्या प्रांतातील महिलांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. प्रांताधिकारी आणि अभ्यासकांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. तसे मुलांच्या बॉडी मसाजवरही बंदी (Ban on body massage) घातली आहे.

खामा प्रेसच्या वृत्तानुसार, महिला यापुढे सार्वजनिक बाथरूममध्ये आंघोळ करू शकणार नाहीत. त्यांना खाजगी बाथरूममध्ये आंघोळ करता येईल आणि इस्लामिक हिजाब घालावा (Take a bath wearing hijab) लागेल. उलेमांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे सद्गुण आणि दुर्गुण प्रतिबंध संचालनालयाच्या प्रमुखांनी सांगितले.

taliban
आजीचे अवैध संबंध; अडसर ठरणाऱ्या ३ वर्षीय नातीची हत्या

लोकांच्या घरात आधुनिक स्नानगृहे नसल्यामुळे पुरुषांना सार्वजनिक स्नानगृहात जाण्याची परवानगी आहे. परंतु, महिलांनी हिजाब घालून खाजगी स्नानगृहात जावे, असे प्रमुख म्हणाले. अल्पवयीन मुलांना सार्वजनिक बाथरूममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मुलांवर बॉडी मसाज करण्यावरही बंदी (Ban on body massage) घालण्यात आली आहे.

स्नानगृह तात्पुरते बंद

पश्चिम हेरात प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी महिलांचे स्नानगृह तात्पुरते बंद केले. प्रमोशन आणि प्रिव्हेंशन ऑफ व्हाईस मंत्रालयाने देशभरातील महिलांचा प्रवास ४५ मैलांपर्यंत मर्यादित ठेवला आहे आणि ड्रायव्हर्सना त्यांच्या कारच्या पुढील सीटवर दोन महिलांना बसू देऊ नये अशी शिफारस केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com