तालिबानच्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानात 56 ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

कंदहार : तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील शहरांवर केलेल्या बॉंबहल्ल्यांत संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) पाच अधिकाऱ्यांसह 56 लोक ठार झाले आहे. तालिबानी दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू असून, काल दक्षिण कंदहारमध्ये गव्हर्नर कार्यालयाच्या आवारात झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला.

या घटनेच्या तासाभरापूर्वी काबूल येथे तालिबान्यांनी संसदेच्या इमारतीजवळ अधिकाऱ्यांच्या घरांवर केलेल्या दोन स्फोटांमध्ये किमान 36 जण ठार झाले, तर 80 जण जखमी झाले. काल लष्करगाह येथे एका तालिबानी दहशतवाद्याच्या आत्मघातकी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तानातील असुरक्षितता वाढली असून, तालिबानी दहशतवादी, तसेच अल कायदा आणि इसिसच्या दहशतवाद्यांशी अमेरिकी सैन्य दले संघर्ष करत आहेत. कंदहारचे गव्हर्नर हुमायून अझिझी आणि "यूएई'चे राजदूत जुमा मोहंमद अब्दुल्ला अल काबी हे स्फोटामुळे भाजून जखमी झाले आहेत. इतरही अनेकांना भाजल्याचे पोलिस अधिकारी अब्दुल राझिक यांनी सांगितले.

"अशा घटनांमुळे अफगाणिस्तान आणि "यूएई'मधील संबंधांवर परिणाम होणार नाही,'' असे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी म्हटले आहे. तालिबानने मात्र कंदहारवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. काबूल हल्ल्यामागे आपण असल्याचे मात्र त्यांनी म्हटले आहे.

Web Title: taliban attack in afghan takes toll of 56