esakal | तालिबान्यांचा पंजशीरवर पुन्हा हल्ला, पूल तोडून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

तालिबान्यांचा पंजशीरवर पुन्हा हल्ला, पूल तोडून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तालिबान : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan crisis) शांततेत सरकार चालविण्याचा दावा तालिबानी करत आहेत. मात्र, दुसरीकडे पंजशीर खोऱ्यावर हल्ला करून त्यांच्या प्रदेशावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी रात्री देखील तालिबान्यांनी पंजशीर (taliban attack on panjshir) खोऱ्यांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नॉर्दन एलायंसच्या योद्ध्यांनी त्यांचा मुकाबला केला.

हेही वाचा: लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

पंजशीर भागातील गुलबहारच्या बाहेर तालिबानी आणि नॉर्दर्न एलायंसच्या योद्ध्यांमध्ये लढाई झाली. इतकेच नाहीतर तालिबान्यांनी याठिकाणी एक पूल देखील तोडल्याची माहिती आहे. याबाबत स्थानिक पत्रकाराने ट्विट करून माहिती दिली आहे. यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या लढाईत सात ते आठ तालिबानींना कंठस्नान घातल्याचा दावा फहीम दाष्टी यांनी केला आहे.

युद्ध आणि शांततेसाठी आम्ही तयार आहोत, असे पंजशीरमधल्या योद्ध्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तालिबानला अन्य प्रांतांप्रमाणे पंजशीर सहजतेने मिळवता येणार नाही, हे आधीच स्पष्ट होतं. तिथे घनघोर लढाईची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आता सुरुवात त्या दिशेने होताना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी तालिबानने सातत्याने या भागावर हल्ले केले आहेत.

पंजशीरला नैसर्गिक संरक्षण

हिंदकुश पर्वतरांगांमध्ये पंजशीर खोर आहे. निर्सगाने समृद्ध असलेला हा प्रदेश नॉर्दन अलायन्सचा बालेकिल्ला आहे. तालिबान तसेच रशियन फौजांना आतापर्यंत कधीही येथे विजय मिळवता आलेला नाही. उंच डोंगररांगा, अरुंद खोरं आणि पंजशीर नदीने दिलेलं नैसर्गिक संरक्षण यामुळे पंजशीरची लढाई तालिबानसाठी अवघड असेल. पंजशीर खोऱ्याकडे जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर देशभक्त तजाक फायटर्स तैनात आहेत.

loading image
go to top