esakal | पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE
sakal

बोलून बातमी शोधा

america drone

पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: रेसिस्टन्स फोर्सचा (Resistance force) पराभव करुन, संपूर्ण पंजशीर खोऱ्यावर (Panjshir valley) नियंत्रण मिळवल्याचा तालिबानने (Taliban) काल दावा केला. त्यानंतर आज पंजशीरमधील तालिबानच्या पोझिशन्सना अज्ज्ञात लष्करी विमानाने (military planes) लक्ष्य केलं. स्थानिक माध्यमांनी हे वृत्त दिलय. मागच्या महिन्यात तालिबानने पंजशीर वगळता अन्य प्रांतांवर अत्यंत सहजतेने नियंत्रण मिळवलं होतं. पण नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या पंजशीरमध्ये त्यांना प्रतिकार झाला.

इथे अहमद मसूद आणि अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली रेसिस्टन्स फोर्सने तालिबान विरोधात लढा दिला. पण काल तालिबानने संपूर्ण पंजशीर जिंकल्याची घोषणा केली. पंजशीरमध्ये राज्यपालांच्या कार्यालयावर तालिबानने आपला झेंडा फडकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

हेही वाचा: पंजशीरच्या युद्धात उतरणाऱ्या पाकिस्तानला इराणने फटकारलं, चौकशीची मागणी

आज पंजशीरमधल्या तालिबानच्या पोझिशन्सवर हवाई हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलेय. पंजशीरमध्ये तालिबानने पाकिस्तानच्या मदतीने विजय मिळवला. पाकिस्तानच्या एअर फोर्सची मदत तालिबानला मिळाली. पाकिस्तानने ड्रोन्समधून बॉम्बफेक केली. ज्यामध्ये रेसिस्टन्स फोर्सचे अनेक योद्धे मारले गेले.

हेही वाचा: स्मृती इराणींनी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये डोशावर मारला ताव

अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये पाकिस्तानचा अशा प्रकारचा हस्तक्षेप इराणला मान्य नाहीय. त्यांनी त्या बद्दल पाकिस्तानला सुनावलं असून ते स्वत: चौकशी करत आहेत. तालिबानवर कोणी हवाई हल्ला केलाय, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ज्या प्रकारे तालिबानला पाकिस्तानने मदत केली, तशीच रेसिस्टन्स फोर्सला कोण मदत करतय, ते लवकरच स्पष्ट होईल.

loading image
go to top