esakal | क्रौर्याचा कळस! नवरा आणि मुलांसमोर तालिबान्यांनी गर्भवतीची केली हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

क्रौर्याचा कळस! नवरा आणि मुलांसमोर तालिबान्यांनी गर्भवतीची केली हत्या

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: अफगाणिस्तानात (afganistan) तालिबानचा (Taliban) निर्दयीपणा, क्रौर्य सुरुच आहे. घोर प्रांतामध्ये तालिबान्यांनी एका महिला पोलिसाची (women police) कुटुंबीयांसमोर गोळ्या घालून हत्या केली आहे. अफगाणिस्तानातील एका पत्रकाराने (journalist) टि्वट करुन ही माहिती दिली. निगारा सहा महिन्यांची गर्भवती होती. तालिबान्यांनी नवरा आणि मुलांसमोर गोळ्या घालून तिची हत्या केली.

तालिबानी मारहाण करतील, या भीतीपोटी अफगाणिस्तानात महिलांनी संपूर्ण अंग झाकणारा पोषाख परिधान करायला सुरुवात केली आहे, असे स्पुटनिकच्या प्रतिनिधीने रविवारी वृत्त दिले. हिजाब आणि बुरख्याशिवाय दिसल्यास या महिलांना मारहाण होऊ शकते. १९९० च्या दशकात अफगाणिस्तानात महिला सार्वजनिक ठिकाणी अशाच पद्धतीने वावरायच्या. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: पंजशीरमध्ये पाकिस्तानी Air Force कडून बॉम्बफेक

शिक्षणाचा अधिकार आणि राजकारणात प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी काबुल आणि हेरातमध्ये महिलांनी निदर्शने केली आहेत. महिलांचा आवाज दडपून टाकण्यासाठी तालिबानची राजवट ओळखली जाते.

loading image
go to top