esakal | तालिबान म्हणते, विजय साऱ्या अफगाणिस्तानचा
sakal

बोलून बातमी शोधा

Zabihullah Mujahid

तालिबान म्हणते, विजय साऱ्या अफगाणिस्तानचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल - अमेरिका (America) आणि नाटो सैन्याने (Nato Army) निर्धारित मुदतीत काढता पाय घेताच तालिबानला (Taliban) आणखी चेव चढला आहे. इतर आक्रमकांना हा धडाच असल्याचे वक्तव्य तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्लाह मुजाहीद (Zabihullah Mujahid) याने केले आहे.

दोन दशके संघर्ष केलेल्या अमेरिकेच्या माघारीनंतर विमानतळाच्या धावपट्टीवरच त्याने पत्रकारांशी संवाद साधला. अभिनंदन अफगाणिस्तान, हा विजय आपल्या सर्वांचा आहे असे उद्गार त्याने काढले.

हेही वाचा: VIDEO: तालिबानच्या क्रौर्याचे दर्शन; हेलिकॉप्टरला लटकावला मृतदेह

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली याच विमानतळावरून एक लाख २३ हजार लोकांची सुटका करण्यात आली. ही मोहीम सोमवारी पूर्णत्वास गेली. आता कट्टर इस्लामी गट असलेल्या तालिबानच्या राजवटीत सामान्य नागरिकाला भयग्रस्त होऊन जगणे भाग पडेल. याआधी १९९६ ते २००१ दरम्यान तालिबान्यांकडे सत्ता होती तेव्हा मुली आणि महिलांवर अत्याचार झाले. क्रूर अशा न्यायपद्धतीमुळे दहशत निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर तालिबानने आपले सरकार जास्त सहिष्णू आणि खुले असेल असा दावा केला. मुजाहीद याने याचीच री ओढली. तालिबानी सुरक्षा दले जास्त सभ्य आणि छान वागतील, असा दावा त्याने केला.

आम्हाला अमेरिका आणि जगाबरोबर चांगले संबंध हवे आहेत. सर्वांबरोबर चांगले राजनैतिक संबंध ठेवण्याचे आम्ही स्वागत करतो, असेही त्याने नमूद केले.

loading image
go to top