esakal | चीनला आम्ही अफगाणिस्तानचा मित्र मानतो- तालिबान
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्याने अफगाणिस्तानमधील घडामोडींना महत्त्व प्रात झालं आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानची शक्ती वाढणार आहे. त्यातच तालिबानने म्हटलंय की, तो चीनला आपला मित्र म्हणून पाहतो.

चीनला आम्ही अफगाणिस्तानचा मित्र मानतो- तालिबान

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बिजिंग- अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्याने अफगाणिस्तानमधील घडामोडींना महत्त्व प्रात झालं आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानची शक्ती वाढणार आहे. त्यातच तालिबानने म्हटलंय की, तो चीनला आपला मित्र म्हणून पाहतो. तसेच उईगर कट्ट्ररवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये स्थान दिले जाणार नाही, त्यामुळे चीनने घाबरण्याचे कारण नाही, असं तालिबानकडून सांगण्यात आलं आहे. झिनजियांग प्रांत (Xinjiang ) चीनसाठी डोकेदुखी ठरला आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने चीनला अश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (Taliban Says It Sees China As A Friend Afghanistan Xinjiang)

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून 31 ऑक्टोबरपर्यंत सैन्य परत बोलवणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे जगासह चीनला चिंता सताऊ लागली आहे. चीनने आपल्या 210 नागरिकांना अफगाणिस्तानमधून परत बोलावलं आहे. तालिबान्यांची सत्ता आल्यास अफगाणिस्तान तुर्किश इस्लामिक चळवळीचे East Turkistan Islamic Movement (ETIM) केंद्र होईल आणि त्यामुळे झिनजियांगमधील विभाजनवादी शक्तींना अधिक जोर मिळेल, अशी चिंता चीनला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या चीनच्या झिनजियांग प्रांताची अफगाणिस्तानशी 8 किलोमीटरची सीमा लागून आहे.

हेही वाचा: 'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

चीनच्या हालचालीनंतर तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी चीनला अश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय. चीनला आम्ही मित्राच्या स्वरुपात पाहतो. अफगाणिस्तानमधील विकास कामासाठी चीनच्या गुंतवणुकीचे स्वागत आहे. चीन गुंतवणूक करणार असेल तर आम्ही सुरक्षा पुरवू. चीन आणि आमचे संबंध चांगले राहिले आहेत. अफगाणिस्तान उईगर विभाजनवाद्यांना देशात आश्रय घेऊ देणार नाही. तसेच अल-कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना देशात प्रभाव वाढवू पाहणार नाही, असं सुहेल शाहीन म्हणाले.

हेही वाचा: सावधान! संसर्ग पुन्हा वाढतोय; WHO कडून तिसऱ्या लाटेचा इशारा

अमेरिका अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आली होती, पण ते न करताच काढता पाय घेतला आहे, असं म्हणत चीनने अमेरिकेवर टीका केली. तसेच अफगाणिस्तानमध्ये चिनी नागरिक आणि अनेक प्रोजेक्टंना सुरक्षा देण्यासाठी पाकिस्तानने पुढे यावं, असं चीनने म्हटलं आहे. अफगाणिस्तानमधील समस्यांची झळ चीन आणि पाकिस्तान दोघांना बसणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करायला हवं, असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते. दरम्यान, चीनने मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मदतीने तालिबानसोबत जुळवून घेण्याचा चीनचा प्रयत्न आहे. अफगाणिस्तान

loading image