अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या; VIDEO VIRAL

अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या; VIDEO VIRAL
Summary

कॉमेडियनचे तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्याला कारमध्ये अनेकदा थप्पड मारली, नंतर त्याची हत्या केली.

अफगाणिस्तानावर ताब मिळवण्यासाठी तालिबानकडून तिथल्या सैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांचा छळ केला जात आहे. तालिबानने अनेक लोकांची हत्यासुद्धा केली आहे. आता तालिबानने एका कलाकाराची हत्या केली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध कॉमेडियन नजर मोहम्मद उर्फ खाशाची अपहरणानंतर तालिबानने हत्या केल्याचं समोर आलं आहे.

दहशतवाद्यांनी खाशाची हत्या करण्याआधी त्याला कानशिलात लगवातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून इरान इंटरनॅशनलच्या तजुदेन सोरौश यांनी 27 जुलै रोजी ट्विटरवरून शेअऱ केला आहे. व्हिडिओमध्ये तालिबानी दहशतवादी बंदुक घेतलेले दिसत असून कॉमेडियन खाशाला अनेकदा कानशिलात लगावताना दिसतात.

तजुदेन सोरौश यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कंधारी कॉमेडियन खाशाचे आधी तालिबानी दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्याला कारमध्ये अनेकदा थप्पड मारली आणि नंतर त्याची हत्या केली.

अपहरणानंतर तालिबानने कॉमेडियनची केली हत्या; VIDEO VIRAL
या 'तुरुंगात' मिळते दारु! पैसे खर्च करून तुरुंगवास भोगतात कैदी

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंधार प्रांतात राहणाऱ्या कॉमेडियन खाशाला गेल्या आठवड्यात त्याच्या घरातून तालिबानींनी फरफटत बाहेर नेलं. त्यानंतर झाडाला बांधून त्याची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांकडून सरकारी कर्मचाऱ्यांचा शोध घरोघरी जाऊन घेतला जात आहे. गेल्या गुरुवारी 22 जुलै रोजी तालिबानींनी खाशाला पकडलं आणि एका झाडाला बांधलं. त्यानंतर खाशाची गळा चिरून हत्या करण्यात आली.

खाशा स्थानिक पोलिसात काम करत होता. त्याचे शीर जमिनीवर धडावेगळे झालेले आढळून आले. कंधार पोलिसात सेवा बजावणाऱ्या कॉमेडीयन खाशाच्या हत्येसाठी त्याच्या कुटुंबियांनी तालिबान जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. तर दुसऱ्या बाजुला तालिबानने मात्र नेहमीप्रमाणे याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com