'आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा...', तालिबानचा पाकिस्तानला इशारा|Taliban Warned Pakistan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban Warned Pakistan

'आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा...', तालिबानचा पाकिस्तानला इशारा

अफगाणिस्तानच्या खोस्ट आणि कुनार प्रांतांवर नुकताच हवाईहल्ला करण्यात आला. यामध्ये ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर तालिबान (Taliban) सरकारने पाकिस्तानला (Pakistan) इशारा दिला आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या लोकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा माहिती आणि संस्कृतीचे उपमंत्री जबिउल्ला मुजाहिद म्हणाले.

हेही वाचा: पाच लग्न, तीनवेळा मुख्यमंत्री, कोण आहेत पाकिस्तान PM पदाचे दावेदार शाहबाज शरीफ?

"आम्ही मुत्सद्दी मार्गाने आणि वाटाघाटीद्वारे समस्येचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अशा कृतींमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव निर्माण होईल. त्यामुळे कोणात्याही बाजूने संघर्ष निर्माण होऊ शकतो, असं मुजाहिद म्हणाले. तालिबानकडून हवाईहल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यानंतर तालिबान सरकारने त्यांच्या काबूलमधील अफगाण राजदूत अहमद खान यांना परत बोलावले आणि पाकिस्तानला हल्ले रोखण्यास सांगितले.

पाकिस्तानच्या विमानांनी आग्नेय खोस्ट प्रांतातील स्पेरा जिल्ह्यात नागरिकांच्या घरांवर बॉम्बफेक करून किमान 60 नागरिक ठार झाले, असे खमा प्रेसने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने स्ट्राइकची पुष्टी केलेली नाही. काबूलमधील पाकिस्तानच्या दूतावासाने हवाई हल्ले केल्याच्या वृत्ताला नकार दिला. अफगाणिस्तानातून त्यांच्या सुरक्षा दलांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या असून तालिबान अधिकाऱ्यांनी अशा अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी. दहशतवादी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानमध्ये कारवाया करण्यासाठी करत आहेत, असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

उत्तर वझिरिस्तानमध्ये सात पाकिस्तानी सैनिक मारले गेल्यानंतर काही दिवसांनी हे हवाई हल्ले झाले. हा भाग पूर्व अफगाण प्रांताच्या सीमेला लागून आहे जेथे हवाई हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Web Title: Taliban Warned Pakistan Over Khost Province Airstrike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top