esakal | कोरोनाची भीती नसलेला देश; कशाच्या जोरावर आहे बिनधास्त?
sakal

बोलून बातमी शोधा

TANZANIYA.

सर्व जग कोरोनामुळे हैराण झालेलं असताना असा एक देश आहे ज्याने प्रार्थना, लिंबूचा काढा, स्टीम इनहेलेशनच्या जोरावर कोरोवर मात केल्याचा दावा केलाय.

कोरोनाची भीती नसलेला देश; कशाच्या जोरावर आहे बिनधास्त?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सर्व जग कोरोनामुळे हैराण झालेलं असताना असा एक देश आहे ज्याने प्रार्थना, लिंबूचा काढा, स्टीम इनहेलेशनच्या जोरावर कोरोवर मात केल्याचा दावा केलाय. टांझानिया हा आफ्रिकेतील देश. ऑस्ट्रेलियापेक्षा दुप्पट या देशाची लोकसंख्या. सरकारी आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत केवळ 509 कोरोनारुग्ण आढळले असून 21 लोकांचा प्राण गेला आहे. 

कोरोना महामारीला रोखण्यासाठी जगातील सर्व देशात लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला गेला. पण टांझानियाने लॉकडाऊनला पूर्णपणे नाकारलं. त्यामुळे नागरिकांनी प्रार्थनेच्या शक्तीवर विश्वास दाखवला. तसेच पारंपरिक उपचार पद्धती, जसे की स्टीम स्टीम इनहेलेशन, आले, लिंबूचे मिश्रण अशा पद्धतींचा वापर केला. 

मोदींना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानच्या करीमा बलोच यांचा संशयास्पद मृत्यू

टांझानियाचे अध्यक्ष जॉन मॅगफुली (John Magufuli) यांनी प्रशासनाला 1 मे महिन्यापासूनच कोरोना रुग्णांची संख्या न मोजण्याचा आदेश दिला. त्यानंतर जूनमध्ये तीन दिवसासाठी नागरिकांनी केलेला उपवास आणि प्रार्थना यामुळे देश कोरोनामुक्त झाल्याचं त्यांनी घोषित करुन टाकलं. देवीशक्तीने देशाने कोरोना विषाणूला हरवलं आहे, असंही जॉन मॅगफुली यांनी जाहीर केलं. 

कोरोना रुग्णांची संख्या मोजणे बंद करणे आणि त्यानंतर देशाला कोरोनामुक्त घोषित केल्यामुळे टांझानिया चर्चेत आला. टांझानियाला लागून असलेल्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते केनियामध्ये जवळजवळ 1 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 1600 जणांचा यामुळे मृत्यू झाला होता. असे असताना टांझानियाने देशाला कोरोनामुक्त जाहीर केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. 

भारतातही कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन? आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

टाझांनिया सरकारने कितीही नाकारले तरी तेथील काही स्वतंत्र माध्यमे आणि एनजीओंनी चित्र वेगळं असल्याचं म्हटलं आहे. देशात कोरोनाचे रुग्ण आहेत. तसेच कोरोना विषाणूमुळे मृत झालेल्यांना रात्रीच्या अंधारात पुरलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यात कडक सुरक्षाव्यवस्थेत लोकांचे अंत्यसंस्कार केले जात होते. 

सरकारने सुरुवातापासून कोरोना नियमांचा न पाळण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे येथील लोक मास्क, किंवा शारीरिक अंतराचे पालन करताना दिसले नाहीत. अनेक धार्मिक गुरुंनी देशात कोरोना नसल्याचा दावा केला. तसेच त्यांनी कोरोनावर उपचार म्हणून अनेक पारंपरिक औषधी घेण्याचा लोकांना सल्ला दिला.  

loading image
go to top