Indian student dies in USA: अमेरिकेतील गोळीबारात 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

गोळीबारात मृत्यू पावलेला भारतीय विद्यार्थी अमेरिकेत MS करण्यासाठी गेला होता.
Breaking News
Breaking News Sakal

नवी दिल्ली : अमेरिकेत झालेल्या गोळीबारात एक 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. अल्बामा राज्यातील माँगमोमरी सिटीमध्ये रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. डोक्याला गोळी लागल्यानं गंभीर जखमी झाल्यानं या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला. (Telangana student Akhil Sai dies in shooting incident in USA)

Breaking News
Ambadas Danve: आदित्य ठाकरेंच्या गाडीवर शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला

महानखाली अखिल साई (वय 25) या तेलंगाणातील मधीरा शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, वाहनांमध्ये गॅस भरण्याच्या स्टेशनवर एका सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली. ही गोळी थेट अखिल साईच्या डोक्याला लागली, यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. या दुर्घटनेनंतर अखिलला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं.

Breaking News
Turkey Syria Earthquake : तुर्कीला आतापर्यंत बसलेत 435 झटके! मृतांची संख्या 8 हजारांच्या पुढे

अमेरिकेनं पोलिसांकडून अखिल साईच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. यानंतर अखिलच्या पालकांनी भारत सरकार आणि तेलंगणा सरकारकडं आपल्या मुलाचं पार्थिव अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी आपली मदत करावी अशी विनंती केली आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये अखिल साई अमेरिकेत माँटगोमरी इथल्या ऑबर्न विद्यापिठात मास्टर्स इन सर्जरीच्या (MS) शिक्षणासाठी गेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com