भारत-चीन सीमावाद; रशियानंतर आता इस्त्राईलने दिली प्रतिक्रिया

वृत्तसंस्था
Thursday, 10 September 2020

भारत-चीन तणावाबाबत रशियाच्या प्रतिक्रियेनंतर आता इस्राईलनेही (Israel) बुधवारी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीनने आपले मतभेद शांततेत सोडवावेत असा सल्ला दिला आहे.

जेरुसलेम: India-China Standoff: मागील काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर (Line of Actual Control ) तणावपूर्ण परिस्थिती आहे.  लडाखमधील पॅंगॉंग सो तलावाच्या (Pangong Tso) दक्षिणेकडील भागात भारतीय जवानांकडून पराभूत झाल्यानंतर चिनी सैन्याने आता उत्तर भागात आपले सैन्य वाढविणे सुरू केले आहे. यादरम्यान भारत-चीन तणावाबाबत रशियाच्या प्रतिक्रियेनंतर आता इस्राईलनेही (Israel) बुधवारी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीनने आपले मतभेद शांततेत सोडवावेत असा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आशिया-पॅसिफिक संबंधाचे उपसंचालक गिलाद कोहेन (Gilad Cohen) यांनी ऑनलाईन ब्रीफिंग दरम्यान भारत आणि चीनमधील तणावाबाबत हे भाष्य केलं.  यावर बोलताने कोहेन यांनी सांगितलं की, 'वादाचे मुद्दे तसेच इतर सर्व प्रश्न दोन्ही देशांनी शांततेने सोडवावेत. इस्रायलचे दोन्ही देशांशी चांगले संबंध असून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध वाढवण्यासही आम्ही तयार आहोत. इस्त्राइल आशियातील सर्व देशांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि हे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. 'पुढे बोलताना कोहेन यांनी इस्त्राइलचे संबंध भारताबरोबर तसेच चीनसोबत नेहमी चांगले राहिले असल्याचे सांगितले. चिनी सैन्याने सोमवारी पूर्व लडाखमध्ये  सीमेजवळ जाण्याचा प्रयत्न करुन आणि हवेत गोळीबारही केला होता, त्यानंतर दोन्ही देशातील तणाव अजून  वाढला होता. मागील 45 वर्षानंतर पहिल्यांदा Line of Actual Controlवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 रशियानेही दोन्ही देशांमध्ये शांततेची आशा व्यक्त केली आहे-
भारत आणि चीन सीमा विवाद वाटाघाटीद्वारे सोडवतील अशी आशा रशियाने (Russia) मंगळवारी व्यक्त केली. त्याचबरोबर रशियाने दोन्ही देशांच्या संमती असेल तर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचेही सांगितले आहे. भारतातील रशियन दूतावासाचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, पूर्व लडाखमधील दोन्ही देशातील तणाव कमी व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि ती संवादाच्या माध्यमातून कमीही करता येईल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension persists on Indo-China border Israel responded on this issue

Tags
टॉपिकस
Topic Tags: