'पाकिस्तान हा मित्र कमी; धोका अधिक'

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

अफगाणिस्तानात तालिबानला पाठिंबा देणे थांबविल्यास निर्बंधांबाबत फेरविचार करता येईल, असे रशियाला सांगावे आणि अफगाणिस्तान, पाकिस्तानबाबत अमेरिकेशी सहकार्य केल्यास दोघांनाही फायदा होईल, असे चीनला सांगावे, असा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे.

वॉशिंग्टन : पाकिस्तान हे अद्यापही तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसाठी आश्रयस्थान असून, हा देश मित्र कमी आणि धोका अधिक आहे, असे मत अमेरिकेतील तज्ज्ञांनी मांडले आहे.

या दहशतवादी संघटनांना पाठबळ देणे पाकिस्तानने न थांबविल्यास त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा इशारा द्यावा, असा सल्लाही या तज्ज्ञांनी अमेरिका सरकारला दिला आहे.

अमेरिकेतील सेंटर फॉर स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज्‌ (सीएसआयएस) या संस्थेने आज आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. 'तालिबान आणि हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी पाकिस्तानमध्ये सर्रास वावरत असून येथील सरकारच्या पाठबळावर अफगाणिस्तान आणि इतरत्र दहशतवादी कारवाया करत आहेत. हा देश अमेरिकेसाठी मित्र कमी आणि धोका अधिक आहे. त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा इशारा अधिक स्पष्टपणे देणे आवश्‍यक आहे,' असे या अहवालात नमूद केले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानला पाठिंबा देणे थांबविल्यास निर्बंधांबाबत फेरविचार करता येईल, असे रशियाला सांगावे आणि अफगाणिस्तान, पाकिस्तानबाबत अमेरिकेशी सहकार्य केल्यास दोघांनाही फायदा होईल, असे चीनला सांगावे, असा सल्लाही या अहवालात देण्यात आला आहे.

Web Title: terrorism Pakistan Taliban US Defense global news Marathi news