रिव्होल्यूशनरी स्ट्रगलच्या दहशतवाद्याला अटक

यूएनआय
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

अथेन्समधील अमेरिकेच्या दूतावासावर 2007 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्याचा समावेश होता.  रौपा हा 2012 पासून फरार होता. रिव्होल्यूशनरी स्ट्रगल दहशतवादी गटाने केलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होता.

अथेन्स - रिव्होल्यूशनरी स्ट्रगल गटाच्या एका दहशतवाद्याला गुरुवारी ग्रीक पोलिसांनी अटक केली. हा दहशतवादी आपल्या मुलासह येथे लपला होता. पनागिओटा रौपा असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. अथेन्समधील अमेरिकेच्या दूतावासावर 2007 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्याचा समावेश होता.

रौपा हा 2012 पासून फरार होता. रिव्होल्यूशनरी स्ट्रगल दहशतवादी गटाने केलेल्या अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होता. 2003 मध्ये या दहशतवादी गटाने सरकारविरुद्ध युद्ध पुकारले होते. रौपा हा निकोस माझिओटीक या दहशतवाद्याचा साथीदार आहे. माझिओटीक हा सध्या तुरुंगात आहे. माझिओटीक हा 2009 मध्ये अथेन्समधील शेअर बाजारावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता.

Web Title: Terrorist arrested in Greece