टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क Twitter बोर्डमध्ये सामील होणार नाहीत

Elon musks tesla in India government rejects tesla tax breaks demand
Elon musks tesla in India government rejects tesla tax breaks demand

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे.

मस्क हे स्वत: ट्विटर बोर्डमध्ये सामील होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी संबंधित वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका निवेदनात अग्रवाल यांनी माहिती दिली की, बोर्डात सामील होण्याबाबत त्यांची आणि कंपनीच्या बोर्डाची एलॉन मस्कसोबत अनेकदा चर्चा झाली आहे. (Elon Musk News)

Elon musks tesla in India government rejects tesla tax breaks demand
एलन मस्क यांची ट्विटरमध्ये गुंतवणूक; विकत घेतले 'इतके' शेअर्स

'आम्ही सहयोग करण्यास आणि व्यवसायातील रिस्क फॅक्टरबद्दल उत्सुक आहोत. एलॉन मस्क हे स्वत अन्य सर्व बोर्ड सदस्यांप्रमाणे कंपनीचे सदस्य होतील, असा आमचा विश्वास होता. तसेच त्यांनी कंपनीच्या आणि आमच्या सर्व भागधारकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा होती. सोबत व्यवसाय करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. बोर्डाने त्यांना सदस्यत्वही जाहीर केलं होतं, असं अग्रवाल यांनी म्हटलंय.

ट्विटरच्या सीईओनी कंपनीला एक संक्षिप्त स्वरुपाची नोट पाठवली आहे. यामध्ये त्यांनी एलॉनकडे सदस्यत्व जाण्याबद्दल माहिती दिलीय. कंपनीचा सर्वात मोठा भागधारक असल्याने, एलॉन मस्क यांच्या इनपुट्सचा विचार केला जाईल, असं त्यांनी म्हटलंय.

अग्रवाल पुढे म्हणाले की, 'आम्ही मंगळवारी जाहीर केलं की कंपनीची पार्श्वभूमी तपासणी आणि औपचारिक स्वीकृतीनंतर एलॉन मस्कची बोर्डाच्या सदस्यांमध्ये नियुक्ती केली जाईल. त्यांची बोर्डावर नियुक्ती 9 एप्रिलपासून अधिकृतपणे होणार होती. परंतु एलॉनने त्याच सकाळी माहिती शेअर केली. यानुसार ते यापुढे ट्विटरच्या बोर्डात सामील होणार नाहीत.

टेस्लाची ट्विटरमध्ये गुंतवणूक

दिग्गज उद्योगपती आणि टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर (twitter) मध्ये 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अशी माहिती यूएस एसईसी (Securities and Exchange Commission) फाइलिंगमध्ये देण्यात आली आहे.

Twitter Inc. ने त्यांच्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, एलन मस्क यांच्याकडे 73,486,938 इतके कॉमन स्टॉक आहेत. या अपडेटनंक Twitter Inc चे शेअर्स 25.8 टक्क्यांनी वाढून $49.48 प्री-मार्केट ट्रेडवर पोहोचले.

नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याबात गंभीर विचार करत असल्याचे मस्क यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तत्पूर्वी, मस्कने एक ट्विट केले होते जे वापरकर्त्यांना विचारले होते की त्यांना वाटते का की ट्विटर भाषण स्वातंत्र्याच्या तत्त्वाचे पालन करते. मस्क हे ट्विटरवर खूप सक्रिय आहेत आणि त्यांनी यापूर्वी देखील प्लॅटफॉर्मवर टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com