Thailand Election Results : थायलंडमध्ये विरोधकांना मतदारांची पसंती

मतमोजणीत युवा नेते आघाडीवर; पंतप्रधानांना नाकारले
Thailand Election Results
Thailand Election Resultssakal

बँकॉक : थायलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी लष्करधार्जिण्या सत्ताधाऱ्यांना दणका देत विरोधकांना सत्तेच्या दिशेने नेला आहे. देशात २०१४ मध्ये पंतप्रधान प्रयुत चान-ओचा सत्तेवर आल्यापासूनच्या नऊ वर्षांत झालेला हा सर्वांत महत्त्वपूर्ण बदल समजला जात आहे. ओचा यांची हार झाल्यास थायलंडला युवा नेतृत्व मिळणार आहे.

देशात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मतदानाचा शेवटचा टप्पा रविवारी (ता.१४) पार पडला. आज सकाळपर्यंत झालेल्या ९९ मतमोजणीत विरोध पक्ष मूव्‍ह फॉर्वर्ड पार्टी (एमएफपी) आणि फियू थाय पार्टी सर्वधिक जागा जिंकल्या आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ‘एमएफपी’ला १४८ जागा मिळाल्या आहेत. त्यातील ११३ जागांवर या पक्षाला थेट विजय मिळाला तर ३५ जागा पक्षांच्या यादीतून भरल्या आहेत.

पेटोंगटर्न शिनावात्रा (वय ३६) यांच्या नेतृत्वाखालील फियू थाय पार्टीने १३८ जागा जिंकल्या आहेत. त्यातील १११ थेट विजय मिळाला तर २७ जागांची पक्षांतून निवड झाली आहे. पेटोंगटार्न या माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्या कन्या आहेत. ‘एमएफपी’ने प्रतिनिधी सभागृहासाठी २४ टक्के मते मिळविली असून ‘फियू थाय ’ने २३ टक्के मते मिळविली आहेत. थायलंडचे विद्यमान पंतप्रधान प्रयुत चान ओचा यांच्या ‘युनायटेड थाय नॅशनल पार्टी’ला नऊ टक्के मते पडली असून पाचव्या स्थानावर आहे.

‘एमएफपी’ पक्षाची स्थापना युवा नेता पिटा लिमजारोंरॅट (वय ४२) यांनी २०२०मध्ये केली आहे. या नवख्या पक्षाला थायलंडमधील मतदारांनी भरभरून मतदान केल्याने उत्साही वातावरण असून ‘अभूतपूर्व’ अशी प्रतिक्रिया पिटा यांनी दिली. ‘आम्ही जनतेला जे आश्वासन दिले, ते निवडणुकीनंतरही आम्ही त्यावर ठाम राहू.

लष्कर धार्जिण्या पक्षांबरोबर सरकार स्थापनेच्या प्रस्तावांसाठी दरवाजे बंद करण्यात आले आहे. शिनावात्रा यांच्या पक्षाबरोबर आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात पंतप्रधानपदी पेटोंगटार्न शिनावात्रा यांना नागरिकांनी पसंती दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com