थायलंडच्या राजेपदासाठी वाजिरालोंगकोर्न यांना निमंत्रण

यूएनआय
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

बॅंकॉक : थायलंडचे राजे भूमिबोल अदुल्यदेज यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्यानंतर येथील संसदेने युवराज माहा वाजिरालोंगकोर्न यांना राजेपद स्वीकारण्यासाठी निमंत्रित केले आहे. तब्बल 70 वर्षे राज्यपद सांभाळणाऱ्या भूमिबोल यांचे 13 ऑक्‍टोबरला निधन झाल्यानंतर थायलंडमध्ये अद्यापही दुखवटा सुरू आहे. भूमिबोल हे थायलंडमधील एकतेचा आधारस्तंभ होते. त्यांच्यानंतर माहा वाजिरालोंगकोर्न यांच्यासमोर देशात शांतता टिकविण्याचे आव्हान आहे. ते बरीच वर्षे परदेशात राहिल्याने जनतेशी त्यांचा फारसा संबंध आलेला नाही. म्हणूनच ही जबाबदारी ते कशी पार पाडतात, याकडे थायलंडच्या नागरिकांचे लक्ष आहे.

Web Title: Thailand's Parliament Officially Invites Prince to Be King