थाळी आणि टाळी कोरोना नाही, सरकारला घालवण्यासाठी!

pot
pot

म्यानमारमध्ये लष्कराने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला दूर करत सत्ता हाती घेतली आहे. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. याच पार्श्वभूमीवर  म्यानमारमधील सर्वात मोठे शहर आणि जूनी राजधानी यांगूनमध्ये थाळ्यांचा आवाज घुमला. लोकांनी भांडे, ड्रम वाजवून आपला संताप व्यक्त केला. लष्करावर असलेला राग त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलाय. दुसरीकडे थाळ्या आणि भांडे वाजवणे कोरोनाच्या काळात उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. जगभरातील लोकांनी आपल्या घरातील भांडे वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त केला. 

भूतकाळात पाहिल्यास थाळ्या किंवा भांडे वाजवणे हे आंदोलनामधील शस्त्र म्हणूनही वापरण्यात आलं आहे. याचा इतिहास मागे 19 व्या शतकापर्यंत जातो. फ्रेंच महिलांनी पॅरिसमधील आपल्या घराबाहेर भांडे वाजवून आर्थिक दुरावस्था आणि अन्न कमतरतमुळे सरकारविरोधात निषेध व्यक्त केला होता.  

1970 मध्ये लॅटिन अमेरिकेच्या महिलांनी चिलीचे मार्कसिस्ट प्रेसिंडेंट सॅलेवँडोर अॅलेंडे यांना विरोध करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला होता. तेव्हापासून जगभरातील अनेक आंदोलनासाठी घरातील वस्तूंचा आवाज करणे एक माध्यम म्हणून वापरण्यात आले आहे. भांड्यांना महिलांना जोडून पाहिलं जातं. तसेच अन्नाची कमतरता म्हणूनही भाड्यांकडे पाहिलं जातं. 

गलवान खोऱ्यातील झटापटीत चीनचे ४५ सैनिक मारले गेले; रशियन वृत्तसंस्थेची माहिती

अनेक प्रसंगामध्ये घराबाहेर पडून आंदोलन करता येत नाही. अशावेळी घरी राहून निषेध व्यक्त करण्यासाठी भांडे एक महत्त्वाचे साधन ठरते. एकोणिसाव्या शतकात महिला घरापुरतं सिमीत होत्या. त्यावेळी त्यांनी निषेधाचा एक चांगला पर्याय शोधून काढला . १९८४ मध्ये चिलीचा हुकुमशहा ऑगस्टो पिनोचेटचा विरोध म्हणून महिलांनी थाळी-भांडी वाजवली होती. त्यानंतर २००१ मध्ये आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या अर्जेंटिनामध्ये अशाच प्रकारचे आंदोलन झाले होते. २०२० मध्ये ब्राझीलीयन अध्यक्ष जैर बोलसेनारो यांच्या कोरोना काळातील ढिसाळ कामाचा विरोध म्हणून नागरिकांनी आपापल्या घरी राहून थाळी आणि भांडी वाजवली होती. 

अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लाईड यांच्या मृत्यूमुळे हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले होते. प्रशासनाने अनेक शहरात रात्रीचा कर्फ्यू लागू केला होता. यावेळी रस्त्यावर उतरण्यावर बंधनं आलेल्या नागरिकांनी घरातील भांडे वाजवून फ्लॉईड यांच्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता.  आईसलँडमध्येही आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांनी रस्त्यावरुन उतरुन सरकारविरोधात भांडी वाजवली होती आणि अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.  अनेकांनी याला किचन भांड्याची क्रांती असं नाव दिलं होतं. स्पेन, इराकमध्येही अशाच प्रकारची आंदोलनं पाहायला मिळाली होती. 

भारत-चीन सीमेवर मोठी घडामोड; उभय देशांच्या सैनिकांची सीमा भागातून माघार

भारतापुरतं बोलायचं झालं तर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना पंतप्रधान मोदी यांनी देशात कर्फ्यू जाहीर केला होता. 22 मार्चपासून देशात सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू होता. तसेच 22 तारखेला आपापल्या घरी राहून टाळ्या वाजवणे, थाळ्या-भांडी वाजवणे, घंटी वाजवून आणि शंख वाजवून देशाची एकजूटता वाढवण्याचे आवाहन केले होते. 

पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवण्यात आली. पंतप्रधान मोदींनी कोरोनाला हरवण्यासाठी ठोस काही करण्यापेक्षा लोकांना घरातील भांडी वाजवायला सांगितलं. या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली होती. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमुळे लोकांनी भांडी आणि थाळ्या वाजवण्याच्या उपक्रमाचा  फज्जा उडवल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक लोकांनी घराच्या बाहेर पडत  परिसरातून रॅली काढली होती. अनेक लोक एकत्र जमा झाले आणि कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com