Coronavirus : ट्रम्प म्हणतात तुमचे उपकार विसरणार नाही; मोदींनी दिले 'हे' प्रत्युत्तर

Thank you India Trump showers praise on Modi for hydroxychloroquine Then modi reply on Twitter
Thank you India Trump showers praise on Modi for hydroxychloroquine Then modi reply on Twitter

नवी दिल्ली : अमेरिकेला भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी मिळाली. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारं ट्विट करत तुम्ही केलेली मदत कधी विसरणार नाही असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी नरेंद्र मोदींना फोन करुन करोनाविरोधातील लढाईत मदत मागितली होती. सोबतच भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केला नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल असा धमकीवजा इशाराही दिला होता. पण, भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी महान नेते असल्याचं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कठीण काळात मित्रांकडून जास्तीत मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन संबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. हे विसरु शकत नाही. या लढाईत आपल्या मजबूत नेतृत्त्वाने फक्त भारतीय नाही तर माणुसकीची मदत करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

ट्रम्प यांच्या या टि्वटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिसाद दिला आहे. प्रेसिडंट तुमच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. अशाच परिस्थितीत मित्र जास्त जवळ येतात. भारत-अमेरिका मैत्री पहिल्यापेक्षा जास्त मजबूत झाली आहे. कोरोना व्हायरस विरोधी या लढयात मानवतेच्या दृष्टीकोनातून भारत शक्य असेल ती सर्व मदत करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची
अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकाची, म्हणजे १२ हजार ९११ इतकी आहे. फ्रान्समध्ये १० हजार ३२८ लोकांचे कोरोनामुळे बळी गेले असून, १०९०६९ लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे. याखालोखाल असलेल्या ब्रिटनमध्ये ६,१५९ लोक मरण पावले असून, करोना संसर्गाची ५५,२४२ प्रकरणे झाली आहेत. चीनने आतापर्यंत ३३३३ कोरोनाबळी जाहीर केले आहेत. त्या देशात करोनाबाधितांची ८१,८०२ प्रकरणे असून, ७७,२७९ लोक करोनामुक्त झाले आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजाराच्या वर गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com