
जगातील 500 प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Islamic NGO : जगातील 500 प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतातून 'यांना' मिळालं स्थान, यादीत दहशतवाद्यांचाही समावेश!
जगातील 500 प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींची (Muslim Person) यादी जाहीर करण्यात आलीये. या यादीत जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद मदनी (Maulana Mohammad Madani) 15 व्या क्रमांकावर आहेत. यात भारतातील अनेक मुस्लिमांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.
जॉर्डनमधील रॉयल ऑल अल-बायत इन्स्टिट्यूट फॉर इस्लामिक थॉटनं (RABIIT) ही यादी जाहीर केलीये. याला 'रॅबिट' म्हणूनही ओळखलं जातं. ही एक इस्लामिक एनजीओ (NGO) आहे. मदनी यांना 'मॅन ऑफ द इयर' देखील घोषित करण्यात आलं आहे. या अहवालात भाजप नेते कपिल मिश्रा यांचंही नाव आहे.
सौदी अरेबियाचा राजा सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद (Salman bin Abdulaziz Al Saud) यांनी 'मुस्लिम 500' या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. इराणचे अयातुल्ला अली खामेनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तालिबान आणि हिजबुल्लासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांनाही या यादीत स्थान मिळालंय.
हेही वाचा: Delhi Riots : दंगलीतील आरोपी उमर खालिदची तिहार तुरुंगातून सुटका; 'या' कारणासाठी 7 दिवसांचा जामीन मंजूर
भारतातील टॉप 50 मध्ये कोण?
रॅबिटनं जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांना 'पर्सन ऑफ द इयर 2023' ही पदवी प्रदान केलीये. 2023 मध्ये हा पुरस्कार मिळवणारे मदनी हे एकमेव व्यक्ती आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींच्या यादीत ते 15 व्या क्रमांकावर आहेत. एनजीओच्या या अहवालात भारतावर जोरदार टीका करण्यात आलीये. यामध्ये लव्ह जिहादचाही उल्लेख करण्यात आला आहे.
हेही वाचा: Kanhaiyalal Murder Case : कन्हैया हत्याकांडाचं 'पाक कनेक्शन'; NIA च्या आरोपपत्रात कराचीतील दोघांची नावं!
यादीतील भारतीय व्यक्तींची नावं आणि मिळालेलं स्थान
शेख अबुबकर अहमद 144
हजरत अल्लामा मौलाना कमरुज्जमान आझमी 150
शबाना आझमी 183
बिल्किस बानो 164
सय्यद इब्राहिमुल खलील अल-बुखारी 144
डॉ. मोहम्मद उमर फारुख 137
डॉ. हसिमा हसन 175
मौलाना साद कांधलवी 144
आमिर खान 183
डॉ. सन्यासनैन खान 164
मौलाना सय्यद अर्शद मदनी 150
मौलाना महमूद मदनी 79
राबे हसनी नदवी 128
बहाउद्दीन मुहम्मद जमालुद्दीन नदवी 128
झाकीर अब्दुल करीम नाईक 117
मुफ्ती अबुल कासिम नोमानी 116
मौलाना शाकीर अली नूरी 144
खासदार असदुद्दीन ओवैसी 145
अझीम प्रेमजी 157
मौलाना बदरुद्दीन अजमल कासमी 157
अल्लाह रक्खा 183
डॉ. मुबीना रमजान 164
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन 151
मौलाना जुहेर उल हसन 145
हेही वाचा: DK Shivakumar : कोरोनाच्या बहाण्यानं भाजपला राज्यात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
यादीत मुस्लिमांच्या 13 श्रेणींचा समावेश
रॅबिट एनजीओनं 500 लोकांची ही यादी जारी केलीये. यापैकी केवळ टॉप-50 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. एनजीओनं निवडलेल्या 13 श्रेणींमध्ये इस्लामिक विद्वान, राजकारणी, धार्मिक व्यवहार प्रशासक, धार्मिक प्रचारक, आध्यात्मिक मार्गदर्शक, देणगीदार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, वैज्ञानिक, कलाकार, कुराण वाचक आणि मीडिया व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये क्रीडा जगतातील दिग्गज आणि दहशतवाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे.