अभंग,ओवी, शाहिरी डफ दुबईत कडाडला ; सांगलीकरांच्या कलाविष्काराने प्रेक्षक भारावले : The World Expo Festival Dubai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगलीकरांच्या कलाविष्काराने दुबईकर भारावले, 'द वल्ड एकस्पो महोत्सवात सादरीकरण

अभंग,ओवी, शाहिरी डफ दुबईत कडाडला ; कलाविष्काराने प्रेक्षक भारावले

तुंग (सांगली) : शाहिरी परंपरा आसलेल्या सांगली जिल्ह्यातील देवानंद माळी यांच्या शाहिरी (Shahiri) आविष्काराने दुबईकर (Dubai) भारावून गेले. दुबईत पार पडलेल्या 'द वल्ड एकस्पो महोत्सवात' शाहिरी पोवाडा त्याचबरोबर मराठमोळ्या लोककलेचे सादरीकरण करून लोककलावंतानी रसिकांची मने जिंकली. यामध्ये सांगलीचे ' मराठी पाऊल पडते पुढेचे विजेत सुप्रसिद्ध शाहिर सम्राट डाॅ. देवांनद माळी (Dr.Dewanand Mali)यांनी सादर केलेल्या पोवाड्याने प्रेक्षकांच्या अंगावरती रोमांच उभे केले. या निमित्ताने महाराष्ट्राची शाहिरी प्रथमच सातासुमुद्रापार दुबईत पोहचली.

महाराष्ट्राच्या मराठी मातीतला लोककलेचा सांस्कृतिक ठेवा लाभलेले अभंग,ओवी, भारूड,पोतराज,वासुदेव पिगंळा,बहुरूपी,कडकलक्ष्मी,गोंधळ, करपल्लवी, शाहिरी पोवाडा, लावणी इत्यादी लोककलांचे 'द वल्ड दुबई एकस्पो 2020 'या मध्ये सादरीकरण करुन महाराष्ट्रातील विविध लोककलाची ओळख दुबईकरांना करुन दिली.

दुबई द वल्ड एकस्पो महोत्सवात  शाहिरी सादर करताना सांगलीचे शाहिर देवानंद माळी व सहकारी

दुबई द वल्ड एकस्पो महोत्सवात शाहिरी सादर करताना सांगलीचे शाहिर देवानंद माळी व सहकारी

शाहिर डाॅ. देवांनद माळी, शाहिर चंद्रिका कल्पनाताई माळी, शाहिर माधवी माळी, युवा शाहिर प्रसाद विभुते, शाहिर अवधुत पवार, शाहिर सुरेश जाधव,प्रवीण जाधव यांनी सादरीकरण केले. तर माया शेळके, सुखदा खांडगे,प्रमिला सुर्यवंशी, प्राजक्ता महामुनी, पुनम जावळे, सुष्टी अंधांरे, यांच्यासह वादक सुभाष खोरोटे, आमित शिंदे, नितिन शिंदे, नितिन प्रधान, राजेंद्र घोलप, यानी साथसंगत केली.

हेही वाचा: बैठकीत तोडगा न निघाल्यास संप कायम; कर्मचाऱ्यांचा निर्धार

मुंबई लोककला अकादमीचे डाॅ. गणेश चंदनशिवे आणि सुखदा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव मुंबई, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांच्या वतीने दुबई मध्ये १८ ते २३ नोव्हेंबर 'द वल्ड एक्स्पो २०२०' हा महोत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आमित देशमुख, आदिती देशमुख. मंत्री सुभाष देसाई, संगीतकार राहुल रानडे आणि दुबई वल्ड एक्स्पोचे विविध पदाधिकारी उपस्थिती होते.

loading image
go to top