ST Strike - बैठकीत तोडगा न निघाल्यास संप कायम; कर्मचाऱ्यांचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

बैठकीत तोडगा न निघाल्यास संप कायम; कर्मचाऱ्यांचा निर्धार

कोल्हापूर - एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत बैठक सुरू झाली आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही परिवहन मंत्री परब यांच्या समवेत अनेक बैठका झाल्या मात्र तोडगा निघालेला नव्हता.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

दरम्यान, आज पुन्हा एकदा ही बैठक होत असून परिवहन मंत्री यांनी यापूर्वीच वेतन वाढ देण्याबाबत सूतोवाच केले होते. मात्र एसटी कर्मचारी विलीनीकरण पाहिजेच आहे या मागणीवर ठाम आहेत. दोन्ही बाजूने संप ताणला गेला आहे. राज्यभरातील हजारो मार्गावर लाखो प्रवासी एसटी प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. यातून अभूतपूर्व कोंडी निर्माण झाली असून आजच्या बैठकीत अंतिम सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा संपकरी कर्मचाऱ्यांची आहे.

परिवहन मंत्री काहीशी लवचिक भूमिका घेऊन तोडगा काढतील अशी अपेक्षाही एसटी कर्मचाऱ्यांना आहे. विलीनीकरणाच्या पातळीवर मात्र काही कायदेशीर व तांत्रिक अडचणी आहेत, त्या कशा दूर कराव्यात व कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वती विषयी काय करता येईल या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एक दीड-दोन तास आतच या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल व संप मिटेल अशी अपेक्षा आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हा संप कायम सुरू ठेवण्याचा निर्धारही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे तोडगा निघतो की नाही संप मिटतो की नाही, याविषयी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांसह लाखो प्रवाशांच्या उत्सुकता शिगेला पोहोचल्या आहेत.

हेही वाचा: अर्ज छाननीनंतर पाटील-महाडिक गटातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

loading image
go to top